ETV Bharat / bharat

MANAGER SUICIDE : नवरा तिरस्कार करतो म्हणत बॅंक मॅनेजरची आत्महत्या - पंजाब नॅशनल बॅंक

पंजाब नॅशनल बॅंकेत (Punjab National Bank) मार्केटिंग मॅनेजर असलेल्या सुरभी या महिलेने मी अस्वस्थ आहे, नवरा माझा तिरस्कार करतो म्हणत (I am upset husband hates me) आत्महत्या केली (PNB manager commits suicide) आहे. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोट (Suicide note) वरुन तीच्या आत्महत्येचा उलगडा झाला आहे. सुरभीचा 6 वर्षांपूर्वीच शाहिदसोबत प्रेमविवाह झाला होता.

manager commits suicide
बॅंक मॅनेजरची आत्महत्या
author img

By

Published : Oct 3, 2022, 1:56 PM IST

जयपूर : पंजाब नॅशनल बँकेची(Punjab National Bank) मार्केटिंग मॅनेजर असलेल्या सुरभी कुमावतने आत्महत्या करत आपले जीवन संपवले (Suicide of PNB Marketing Manager). घटनेची माहिती मिळताच मुहाना पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सोबतच मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठवला. पोलीस अधिकारी लखन सिंह खटाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१६ मध्ये सुरभी कुमावतने उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील गल्ता गेट भागातील बसबदानपुरा येथील रहिवासी शाहिद अली सोबत प्रेमविवाह केला होता. शाहिद अली फक्त 6 वी पास होता आणि सुरभीने बीएससी, एमबीए केले होते.

खटाणा यांनी सांगितले की, सुरभीला 2015 मध्ये बँकेत नोकरी लागली. तिने जून 2022 मध्ये मुहाना परिसरात एक फ्लॅट देखील खरेदी केला होता आणि 11 जून रोजी पती आणि मुलीसह फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली होती. सुरभी पंजाब नॅशनल बँकेत मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्यरत होती. प्रथमदर्शनी असे दिसून आले की फास लटकवताना सुरभीचे गुडघे बेडवर टेकले होते. वैद्यकीय तज्ञांकडून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सुरभीला बुलेट बाईक घ्यायची होती. काही दिवसांपूर्वी ती शोरूममध्ये बाईक पाहून आली होती.

सुरभीला ५ वर्षांची मुलगी असुन तिचे नाव अदारा आहे. महिलेचा पती शाहिदने पोलिसांना सांगितले की, शनिवारी रात्री तो मुलीसोबत झोपला होता. रविवारी सकाळी मला जाग आली तेव्हा सुरभी फासावर लटकलेली होती. शाहिदच्या चौकशीत असे समोर आले की, तो सुमारे 14 वर्षांपूर्वी वॉटर प्लांट चालवत असे. सुरभी ही गोपाळपुरा भागातील एका कोचिंगमध्ये शिकण्यासाठी येत असे. शाहिद हा त्याच्या मित्रासोबत गोपाळपुरा येथे येत असे. शाहिद अलीची एक मैत्रीण होती, जिच्याद्वारे त्याची सुरभीशी भेट झाली. हळूहळू दोघेही प्रेमात पडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेकडून सुसाईड नोट (Suicide note) जप्त करण्यात आली आहे. यात तीने लीहिले आहे की, मला कोणी समजून घेत नाही असे लिहिले आहे. प्रत्येकाला दुखवायचे नव्हते. मला फक्त सुखी व्हायचे आहे. मला कोणाच्याही आयुष्यात अडचण ठरायचे नाही. माझा नवरा माझा तिरस्कार करतो आणि मला सोडून जाण्याची धमकी देतो. स्वार्थी कारणांसाठी माझा वापर केला गेला. मी सर्व काही सोडत आहे. मला वाईट वाटते की मी तुला पाहू शकत नाही मुली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.