नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडेअकरा वाजता एक महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.
बैठकीकडे देशाचे लक्ष
देशातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. देशात रविवारी कारोनाचे तब्बल 2,73,810 नवे रुग्ण आढळले. तर 1,619 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रविवारी एकूण 1,44,178 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात सध्या कोरोनाचे 19,29,329 सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात 12,38,52,566 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोरोनाच्या या स्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या बैठकीत होणाऱ्या चर्चेकडे आता देशवासियांचे लक्ष लागले आहे.