नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमान जयंतीनिमित्त ( Hanuman Jayanti celebration ) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील मोरबी येथे बांधलेल्या हनुमंताच्या 108 फूट उंच पुतळ्याचे ( PM Modi unveils statue of lord hanuman ) अनावरण केले. चार धाम प्रकल्पांतर्गत देशभरात चार दिशांना स्थापित केल्या जाणाऱ्या चार मूर्तींपैकी ही हनुमंताची दुसरी ( statue of lord hanuman in Morbi ) मूर्ती आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटले की, हनुम जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हनुमंत हे श्रेष्ठ भारताचा महत्त्वाचा धागा- पंतप्रधान मोदी म्हणाले, की हनुमंत हे सर्वांना त्यांच्या भक्तीने व त्यांच्या सेवेने जोडतात. प्रत्येकाला हनुमंताकडून प्रेरणा मिळते. हनुमंताच्या शक्तीने सर्व वनात राहणारे प्राणी आणि बांधवांना एकत्रित राहण्याचा अधिकार दिला. हनुमंत हे श्रेष्ठ भारताचाही महत्त्वाचा धागा आहे. पुढे पंतप्रधान म्हणाले, हनुमंताची 108 फूट उंचीची मूर्ती ( 108 FT Statue of Hanuman ) देशाच्या कानाकोपऱ्यात बसवली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण शिमल्यात हनुमंताची मूर्ती पाहत आहोत. आज मोरबीमध्ये आणखी एक मूर्ती बसवण्यात ( Lord Hanuman statue in Gujarat ) आली आहे. रामेश्वरम आणि पश्चिम बंगालमध्ये दक्षिणेत आणखी दोन मूर्ती बसवण्याचे काम सुरू असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
रामकथेचा भाव सर्वांना जोडतो- पुढे पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या विविध भागात रामकथेचेही आयोजन केले जाते. भाषा-बोली कोणतीही असो, पण रामकथेचा भाव सर्वांना जोडतो. सर्वजण भगवंताच्या भक्तीने एकरूप होतात. ही भारतीय श्रद्धा, आपले अध्यात्म, आपली संस्कृती व आपली परंपरा आहे. गुलामगिरीच्या कठीण काळातही रामकथेने विविध विभाग आणि विविध वर्गांना एकत्र केले. रामकथेने स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय संकल्पासाठी एकत्रित प्रयत्नांना बळ दिले, असे ते म्हणाले.