नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिम्सटेक या संघटनेच्या कामाचे कौतुक केले आहे. ही संघटना विभागीय बहुपक्षीय सदस्य देशात संपर्क निर्माण करण्यासंदर्भात आपल्या मास्टर प्लानला अंतिम स्वरुप प्राप्त करून दिले आहे. संघटेनेने विविध पातळ्यावर केलेल्या कार्यातून एक विश्वास निर्माण केला आहे. बिम्सटेकमध्ये भारत देशाव्यतिरिक्त बांग्लादेश, भूटान, नेपाल, श्रीलंका, थायलंड व म्यानमार बिम्सटेक (बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टोरल टेक्निकल अँड इकोनॉमिक को-ऑपरेशन) चे सदस्य आहेत.
कोरोना वायरसच्या संसर्गाला आळा घालण्यावर भर
२४ व्या बिम्सटेक दिनाच्या निमित्ताने मोदी म्हणाले आहेत की, "आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, संघटनेचा विकास होत राहील व एक सुरक्षित शांतिपूर्ण व समृध्द बंगालच्या खाडीच्या निर्मितीसाठी संघटना प्रगती करेल". "आपल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी व सदस्य देशांच्या हितासाठी बिम्सटेक एक विश्वासु क्षेत्रीय संघटनेच्या रुपात समोर येत आहे", असेही मोदी म्हणाले आहेत. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्या संदर्भातील उपाययोजनांच्या मुद्द्यावर जास्त भर दिला.
हेही वाचा - पश्चिम बंगाल : बॉम्बस्फोटात भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू, टीएमसीवर आरोप