ETV Bharat / bharat

PM Modi in Varanasi: टीबीच्या विरोधात लढण्यासाठी काशीतून नवी ऊर्जा मिळेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या एकदिवसीय दौऱ्यावर वाराणसीला पोहोचले आहेत. तेथे त्यांनी रुद्राक्ष कन्व्हेक्शन सेंटरमध्ये जागतिक टीबी परिषदेला संबोधित केले. टीबीच्या विरोधात लढण्यासाठी काशीतून नवी ऊर्जा मिळेल, असे ते यावेळी म्हणाले.

author img

By

Published : Mar 24, 2023, 12:39 PM IST

PM Narendra Modi said in Varanasi, Kashi will give new energy to global resolution against TB
टीबीच्या विरोधात लढण्यासाठी काशीतून नवी प्रेरणा मिळेल.. पंतप्रधान नरेंद्र मोदी

वाराणसी (उत्तरप्रदेश): पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वाराणसीला पोहोचले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी सुमारे 1780 कोटी रुपयांचे 28 प्रकल्प वाराणसीला भेट दिले. रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे पंतप्रधानांनी वन वर्ल्ड टीबी समिटला संबोधित केले. ते म्हणाले की, काशी नगरी हा तो चिरंतन प्रवाह आहे जो हजारो वर्षांपासून मानवतेच्या प्रयत्नांची आणि परिश्रमाची साक्षीदार आहे. कितीही मोठं आव्हान असलं तरी प्रत्येकाच्या प्रयत्नातून एक नवा मार्गही समोर येतो, याची काशी साक्षीदार आहे. मला खात्री आहे की, काशी टीबीसारख्या आजाराविरुद्धच्या आपल्या जागतिक संकल्पाला नवी ऊर्जा देईल.

वन वर्ल्ड टीबी समिट तीन दिवस चालेल: वाराणसीमध्ये क्षयरोग निर्मूलनासाठी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जात आहे. ही टीबी परिषद तीन दिवस चालेल. यामध्ये देशासह परदेशातील तज्ज्ञही विचारमंथन करणार आहेत. या परिषदेत भारतासह 10 देशांचे आरोग्य मंत्री आणि इतर राज्यांचे आरोग्य मंत्री, डॉक्टर आणि कर्मचारी सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या टीबी परिषदेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

भारताला क्षयरोगमुक्त करण्यावर चर्चा: जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी 24 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवशी सुरू होणाऱ्या परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि इतर सेलिब्रिटीही सहभागी होणार आहेत. भारताला क्षयरोगापासून मुक्त कसे करता येईल यावर या कार्यक्रमात चर्चा केली जाईल. तज्ज्ञ रुग्णांना उत्तम उपचार, नवीन औषधे आणि तपासण्याचे तंत्र याबाबत माहिती देतील. कार्यक्रमात सुमारे 1200 लोक सहभागी होत आहेत. विचारमंथनासोबत सर्वेक्षण आणि क्षेत्रीय कामही होणार आहे. या टीबी परिषदेमध्ये तज्ज्ञ भेट देणार आहेत. दौऱ्यासाठी जिल्ह्यातील 5 आरोग्य व कल्याण केंद्रे, ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.

१७०० कोटींच्या प्रकल्पांची भेट: पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधील त्यांच्या लोकसभा मतदारसंघात 1700 कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्प भेट देणार आहेत. यातील एक प्रकल्प रोपवेच्या स्वरूपातही आहे. जे बनारसला जामच्या समस्येपासून मुक्त करेल. यासाठी परिसरातील तरुणांनी पोस्टर लावून पंतप्रधानांचे आभार मानले.

हेही वाचा: भगवान रामावर फारूक अब्दुल्लांचे मोठे विधान, म्हणाले, राम फक्त हिंदूंचाच देव नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.