ETV Bharat / bharat

PM Kisan Scheme Installment Release : पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

पंतप्रधान किसान सम्मान योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) 10 वा हप्ता (releases 10th installment) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील 10 कोटी 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Jan 1, 2022, 3:30 PM IST

नवी दिल्ली - नववर्षाच्या सुरुवातीला देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सम्मान योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) 10 वा हप्ता (releases 10th installment) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील 10 कोटी 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्याना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी 1 लाख 24 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत.

  • काय म्हणाले पंतप्रधान?

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नववर्षाची सुरुवात देशाच्या अन्नदात्यांसोबत करणे हा आपला सन्मान आहे. देशाच्या विकासाला नवी गती आणि ऊर्जा देण्यासाठी भारतीय नागरिक प्रयत्न करत आहेत. गेल्या सात वर्षांत सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. लहान शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

  • करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग -

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर पायाभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यानुसारच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी हा उद्देश ठेवून पंतप्रधान किसान सम्मान योजना सुरू करण्यात आल्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे या योजनेचे दहावा हप्ता आज देशातील जवळपास 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकार वर्षाला देशातील शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये देत असते. देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे.

  • काय आहे पीएम किसान सम्मान योजना -

पीएम-किसान योजनेअंतर्गत ( PM KISAN scheme ) वर्षभरात पात्र शेतकऱ्याला 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम दर 4 महिन्यांनी प्रत्येकी 2 हजार रुपये अशी दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 1.6 लाख कोटी रुपये ( Samman Rashi ) वितरित केल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारकडून 351 शेतकरी गट संस्थांना ( Farmer Producer Organizations ) 14 कोटी रुपयांहून अधिक निधी दिला जाणार आहे. त्याचा सुमारे 1.24 लाख शेतकऱ्यांना लाभ होईल, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.