नवी दिल्ली :शिवरायांनी राष्ट्रकल्याण व लोककल्याणाचा मार्ग दाखविला. महाराष्ट्रात महोत्सव करण्यात येत आहे. रायगड ही स्वराज्याची पहिली राजधानी आहे. शिवरायांच्या कार्याने जनता प्रेरित आहे. शिवप्रेमींना पंतप्रधान मोदींनी राज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहे. महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर राजाच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधानांचा संदेश मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यस्तरीय कार्यक्रमात आयोजित केलेल्या व्हिडिओ संदेशात शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी म्हणाले, की शिवरायांनी एकतेला महत्त्व दिले आहे. जनतेला प्रेरित करणे हे नेत्याचा गुण आहे. शेकडो वर्षांची गुलामगिरी व आक्रमणामुळे जनतेचा आत्मविश्वास हरविला होता. सांस्कृतिक केंद्रावर आक्रमण करून मनोबल खच्चीकरण करण्यात आले. मात्र, छत्रपती शिवरायांनी आक्रमण परतून लावले. त्याचवेळी लोकांमध्ये स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांनी प्रेरित केले.
-
Chhatrapati Shivaji Maharaj is a beacon of courage and bravery. His ideals are a source of great inspiration. https://t.co/eQZgsyTMm4
— Narendra Modi (@narendramodi) June 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Chhatrapati Shivaji Maharaj is a beacon of courage and bravery. His ideals are a source of great inspiration. https://t.co/eQZgsyTMm4
— Narendra Modi (@narendramodi) June 2, 2023Chhatrapati Shivaji Maharaj is a beacon of courage and bravery. His ideals are a source of great inspiration. https://t.co/eQZgsyTMm4
— Narendra Modi (@narendramodi) June 2, 2023
काही राजांकडे शासनव्यवस्था तर काहींकडे सैन्य होते. मात्र, शिवरायांकडे सुशासन व सुराज्य दोन्ही होते. राष्ट्रनिर्माण करण्याची दृष्टी त्यांनी दिली. त्यामुळे ते इतर नेत्यांहून वेगळे आहेत. शिवरायांनी जनतेला आत्मसन्माने जगण्याचा विश्वास दिला-पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्याभिषेक हा इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय- छत्रपती शिवाजी महाराज हे धैर्याचे प्रतीक आहेत. त्यांचे जीवन आदर्श असून प्रेरणास्त्रोत आहे. लोकांचे कल्याण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीचे मूळ तत्व होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 350 वा वर्धापनदिन हा एक प्रेरणा आणि उर्जेचा स्रोत. हा भारताच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा अध्याय आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. कोणत्याही नेत्याचे मुख्य उद्दिष्ट हे आपल्या लोकांना प्रेरित करणे असते. शिवाजी महाराजांनी लोकांमधील गुलामगिरीची मानसिकता संपवली. त्यांचे जीवन आणि काळ आपल्याला सतत प्रेरणा देत आहे. त्यांनी ज्या पद्धतीने नौदलाचा विस्तार करून सागरी किल्ले बांधले ते प्रेरणादायी आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
हेही वाचा-