अयोध्या (उत्तरप्रदेश): Ayodhya Deepotsav: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी रामनगरी अयोध्येत दीपोत्सवाचे साक्षीदार होणार आहेत. यावेळी ते रामलला विराजमानची पूजा करणार आहेत. यासोबतच ते राम मंदिराच्या उभारणीच्या कामांचा आढावा आणि पाहणी करणार आहेत. शनिवारी त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत जय्यत तयारी सुरू होती. pm narendra modi in ayodhya
यावेळेस 23 ऑक्टोबरला अयोध्येत सहावा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी 14.50 लाख दिवे लावून गिनीज बुकमध्ये विक्रम नोंदवला जाणार आहे. सीएम योगी 2017 पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त आहेत. हा दीपोत्सव भव्य आणि दिव्य होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रत्येक स्तरावर तयारीला लागले आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी अयोध्येला पोहोचणार आहेत. ते भगवान श्री रामलला विराजमान यांना प्रार्थना करतील आणि त्यानंतर तीर्थक्षेत्रात सुरू असलेल्या बांधकामांची पाहणी करतील. सायंकाळी ५.४५ वाजता पंतप्रधान प्रभू रामाचा राज्याभिषेक करतील आणि त्यानंतर सरयू नदीच्या काठावर बांधलेल्या नवीन घाटावर आरतीही करतील. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत शेवटच्या टप्प्याची तयारी सुरू होती.