ETV Bharat / bharat

ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी दक्षिण आफ्रिकेत दाखल; 'चांद्रयान 3' च्या लँडिंगवेळी डिजिटली कनेक्ट राहणार - Chandrayaan 3

15 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे दाखल झाले. या परिषदेत जगातील अनेक नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठका होणार आहेत. याशिवाय नरेंद्र मोदी बुधवारी चांद्रयान 3 च्या लँडिंगदरम्यान डिजिटल माध्यमातून भारताशी संपर्कात राहतील.

PM Narendra Modi arrives in South Africa
पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत दाखल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2023, 9:13 PM IST

जोहान्सबर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दक्षिण आफ्रिकेच्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी जोहान्सबर्ग येथे दाखल झाले. या दरम्यान ते 15 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होतील. तसेच ते अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका देखील घेतील. राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून मोदी 22 ते 24 ऑगस्टदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. 2019 नंतर आफ्रिका ब्रिक्स देशांच्या (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) पहिल्या थेट शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. यावेळी चांद्रयान ३ च्या लँडिंगदरम्यान पंतप्रधान मोदी देशाशी डिजिटल माध्यमातून कनेक्ट होतील.

PM Narendra Modi arrives in South Africa
पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत दाखल

मंगळवारी सकाळी रवाना झाले होते : मंगळवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ब्रिक्स देश विविध क्षेत्रात मजबूत सहकार्याचा अजेंडा स्वीकारत आहेत. 'ब्रिक्स देशांना भविष्यातील सहकार्याची क्षेत्रे ओळखण्याची आणि संस्थात्मक घडामोडींचा आढावा घेण्यासाठी ही शिखर परिषद उपयुक्त संधी देईल', असे मोदी म्हणाले.

विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करेल : त्यानंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपल्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याबद्दल पोस्ट केले. 'मी जोहान्सबर्ग येथे होणार्‍या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला जात आहे. मी BRICS-Africa Outreach आणि BRICS Plus संवाद कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होणार आहे', असे मोदींनी लिहिले. 'ब्रिक्स शिखर परिषद ग्लोबल साउथ आणि विकासाच्या इतर क्षेत्रांच्या चिंतेच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल', असेही ते म्हणाले.

25 ऑगस्टला ग्रीसला रवाना होतील : पंतप्रधान मोदी 22 ते 24 ऑगस्टदरम्यान दक्षिण आफ्रिकेत असतील. 25 ऑगस्टला ते तेथून ग्रीसला रवाना होणार आहेत. ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या निमंत्रणावरून ते तेथे जाणार आहेत. नरेंद्र मोदींचा हा पहिलाच ग्रीस दौरा असेल. '40 वर्षांनंतर ग्रीसला भेट देणारा पहिला भारतीय पंतप्रधान होण्याचा मान मला मिळाला आहे', असे ते म्हणाले.

चांद्रयान 3 च्या लँडिंगची क्षणाक्षणाची माहिती घेणार : भारताचे चांद्रयान 3 बुधवारी म्हणजेच 23 ऑगस्टला संध्याकाळी चंद्रावर उतरणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतून डिजिटल माध्यमातून देशाशी जोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. चांद्रयान 3 च्या लँडिंगची क्षणाक्षणाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली जाणार आहे.

हेही वाचा :

  1. Pm Modi To Leave SA Today : पंतप्रधान आजपासून जाणार दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर, ब्रिक्स शिखर परिषदेत होणार सहभागी
  2. ...तर 'चांद्रयान 3' चं लॅंडिंग पडणार लांबणीवर, वाचा इस्रोचे शास्त्रज्ञ असे का म्हणाले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.