ETV Bharat / bharat

'फाळणीच्या भयंकर आठवणींचा दिवस' म्हणून पाळण्यात येणार 14 ऑगस्ट - पंतप्रधान मोदी - फाळणीच्या भयंकर आठवणींचा दिवस

सलग दुसऱ्या वर्षी कोरोना महामारीत स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. नेहमीप्रमाणे राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Aug 14, 2021, 4:37 PM IST

हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा फाळणीच्या भयंकर आठवणींचा दिवस (Partition Horrors Remembrance Day) म्हणून पाळण्यात येणार असल्याचे शनिवारी जाहीर केले. देशाने केलेला संघर्ष आणि त्यागाच्या आठवणींकरिता हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. फाळणीच्या वेदना कधीही विसरता येणार नाहीत. आमचे लाखो बंधू आणि भगिनींना त्यांचे ठिकाण सोडून जावे लागले. मुर्खपणाने केलेला द्वेष आणि हिंसाचारामुळे अनेक जणांना जीवन गमवावे लागले.

सामाजिक एकता भंग करणारे विष आणि दुही काढून टाका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनापूर्वी आवाहन केले. एकतेची भावना, सामाजिक एकता आणि मानवी सक्षमीकरण बळकट करा, असेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा-राहुल गांधींच्या इन्स्टाग्रामवर प्रोफाईलवर कारवाई करा, राष्ट्रीय बालहक्क आयोगाची मागणी

सलग दुसऱ्या वर्षी कोरोना महामारीत स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. नेहमीप्रमाणे राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. राजधानीतील स्वातंत्र्यसोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

हेही वाचा-ट्विटर अकाउंट पुर्ववत होताच राहुल गांधींचे ट्विट, म्हणाले...

दरम्यान, भारताच्या फाळणीमागे काही रंजक घडामोडीदेखील आहेत.

भारताच्या फाळणी होण्यात ब्रिटीशांचेच हितसंबंध

काँग्रेसच्या स्थापनेनंतर भारतात राजकीय स्वातंत्र्याची मागणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिशांना हे समजून आले होते कि, आज ना उद्या आपल्याला भारताला सोडावे लागणार आहे.

भारत अखंड राहिला तर भविष्यात आपल्याला भारतापासून धोका असू शकतो, अशी भीती इंग्रजांना वाटत होती. भारताचे उपखंडातील स्थान पाहता ते सत्यही होते. विभागीय सत्ता म्हणून उद्या भारत उदयास आला तर आपल्याला त्रास होऊ नये, म्हणून देश सोडून जाण्या अगोदर अखंड भारत फूट पाडण्यासाठी इंग्रजांचे हात शिवशिवायला लागले होते. त्यांच्या एकंदर सैतानी कृत्यांचा परिपाक म्हणजेच भारताची झालेली फाळणी आणि पाकिस्तानचा जन्म होय.

हेही वाचा-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने ठोठावले दार?, लहान मुलांना संसर्ग

भारताच्या फाळणीबद्दल काही महत्त्वाचे

  • 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण सीमांची घोषणा मात्र १७ ऑगस्टला करण्यात आली.
  • फाळणीनंतर पूर्व आणि पश्चिम असा विभागलेल्या पाकिस्तानची निर्मिती झाली.
  • पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान असा एकूण 3,66,175 चौरस मैलांचा प्रदेश पाकिस्तानकडे गेला.
  • फाळणी नंतर साधारणतः 1.45 कोटी लोकांचे स्थलांतर करण्यात आले. जगातील हे आजपर्यंतचे सर्वात मोठे स्थलांतर ठरले.
  • फाळणी नंतर झालेल्या दंगली मध्ये साधारणतः 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
  • फाळणीनंतरही एक तृतीयांश मुस्लीम हे भारतातच राहीले होते.

150 वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वतंत्र होत असलेल्या भारतात सर्वत्र आनंदोत्सव होता, मात्र हा आनंद निर्भेळ नव्हता. कारण इंग्रज देश सोडून चालले होते, मात्र, अखंड भारताची फाळणी करून एक भळभळती जखम सर्व भारतीयांच्या उरावर करूनच ते गेले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.