ETV Bharat / bharat

pm narendra modi in sco भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनविण्याच्या दिशेने प्रयत्न, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिटमध्ये सहभागी राष्ट्रांना संबोधित ( pm narendra modi adress sco ) केले. पंतप्रधान म्हणाले की, आम्ही भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या दिशेने प्रगती करत आहोत. पारगमन अधिकारावरून ( transit Right to nation ) त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.

pm narendra modi in sco
pm narendra modi in sco
author img

By

Published : Sep 16, 2022, 5:13 PM IST

Updated : Sep 16, 2022, 5:22 PM IST

नवी दिल्ली : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिटमध्ये सहभागी राष्ट्रांना संबोधित ( pm narendra modi adress sco ) केले. पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे सरकार भारताला जगातील मोठे उत्पादन केंद्र म्हणून रूपांतरित करण्यास कटिबद्ध आहे. ट्रान्झिट अधिकारावरून ( transit Right to nation ) त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी देशांना ट्रान्झिट अधिकार देणे आवश्यक असल्याचा मुद्दा उपस्थित करताना पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला मदत पाठवण्यासाठी भारताला पारगमन अधिकार ( transit Right to nation ) मिळण्यास बरेच महिने लागल्याची माहिती यावेळी दिली.

समरकंदमध्ये उझबेकिस्तानने आयोजित केलेल्या SCO शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणात, पंतप्रधान मोदी म्हणाले, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ला या प्रदेशात विश्वासार्ह, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी विकसित करण्याची गरज आहे. कोविड-19 महामारी आणि युक्रेनच्या संकटामुळे, ज्यासाठी, अधिक चांगली कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, ते पुढे म्हणाले. SCO राष्ट्रांनी एकमेकांना ट्रान्झिट परवाने देण्याची देखील गरज आहे, असे ते पुढे म्हणाले. अफगाणिस्तानात आलेल्या संकटावेळी भारताकडून मदत पाठविताना पाकिस्तानने भारताला ट्रांझिट परवाना देण्यास टाळाटाळ केली, त्या पार्श्वभूमीवर मोदींचे हे वक्तव्य आले आहे.

मोदींनी एससीओमधील आपल्या भाषणात नमूद केले की जग कोविड-19 महामारीवर मात करत आहे. कोविड आणि युक्रेनच्या संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीत अनेक व्यत्यय आले आहेत. आम्हाला भारताला उत्पादन केंद्रात बदलायचे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मोदी पुढे म्हणाले, भारताची अर्थव्यवस्था यावर्षी ७.५% दराने वाढण्याची अपेक्षा आहे. मला आनंद आहे की, आमची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आम्ही लोककेंद्रित अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही प्रत्येक क्षेत्रात नवनिर्मितीला पाठिंबा देत आहोत. आज आमच्या देशात 70,000 हून अधिक स्टार्ट-अप आणि 100 हून अधिक युनिकॉर्न आहेत.

भारत मॅन्युफॅक्चरिंग हबमध्ये प्रगती करत असल्याचे अधोरेखित करताना, पंतप्रधान मोदींनी पुनरुच्चार केला की भारताच्या लोककेंद्रित विकास मॉडेलमध्ये तंत्रज्ञानाच्या योग्य वापरावर बरेच लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या दिशेने प्रगती करत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह चीनचे राष्ट्राध्यक्ष शी आणि इतर जागतिक नेत्यांनीही पुढील वर्षी भारताने अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले आहे.

Last Updated : Sep 16, 2022, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.