नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 15 जुलै 2021 रोजी जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित केले. आत्मनिर्भरता गरजेची असून आजच्या युवकांकडे स्किल असायला हवे, असे आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले. देशातील युवकांचे कौशल्य हेच आत्मनिर्भर भारताचा आधार असल्याचे मोदींनी म्हटलं.
आत्मनिर्भर भारतासाठी युवकांचे कौशल्य हे गरजेचे आहे. ते आत्मनिर्भर भारताचा आधार आहे. गेल्या 6 वर्षात उभारलेल्या नव्या संस्थाच्या मदतीने संपूर्ण ताकद जुटवत आपण स्किल इंडिया मिशनला गती द्यायची आहे, असे मोदी म्हणाले.
शिकणे आणि कमवणे हे सोबतच सुरू ठेवण्यात येत आहे. आजच्या काळात ज्याच्याकडे कौशल्य आहे. तोच विकास करतो. ही बाब व्यक्तीगत आणि देशासाठीही लागू होते. कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांमुळेच कोरोनाचा सामना भारत करू शकला, असे मोदी म्हणाले. तसेच स्किल इंडियामार्फत डॉ.बाबासाहेब आबेंडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही मोदींनी म्हटलं.
कोरोना महामारीत हा दिवस साजरा करण्याची ही दुसरी वेळ आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांनी या दिवसाचे महत्त्व वाढवले आहे. कौशल्य भारत मिशन अंतर्गत आतापर्यंत 1.25 कोटीपेक्षा अधिक युवकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे मोदींनी सांगितले.
मोदी वाराणसी दौऱ्यावर -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर आहेत. तब्बल आठ महिन्यानंतर ते वाराणसी दौऱ्यावर आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान मोदींनी वाराणसीचा दौरा केला होते. या दौऱ्यात ते 15 हजार कोटी रुपयांच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुजरात सायन्स सिटी मधल्या अॅक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे, "रुद्राक्ष" आंतराराष्ट्रीय सहयोग संमेलन केंद्राचे आणि नेचर पार्कचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण सध्या गरम असून मोदींच्या दौऱयाने घडामोडींचा वेग वाढला आहे. राज्यात पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होणार असल्याने मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.