ETV Bharat / bharat

मोदींचा व्हॅक्सीन दौरा...! सीरम, झायडस आणि भारत बायोटेक कंपनीला मोदींची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) कोरोना लसीवर काम करणाऱ्या पुणे, गुजरात आणि हैदराबाद येथील कंपन्यांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी लस तयार करण्याच्या कामाचा आढावा घेतला.

भारत बायोटेक
भारत बायोटेक
author img

By

Published : Nov 28, 2020, 6:46 PM IST

Updated : Nov 28, 2020, 9:36 PM IST

हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) कोरोना लसीवर काम करणाऱ्या पुणे, गुजरात आणि हैदराबाद येथील कंपन्यांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी लस तयार करण्याच्या कामाचा आढावा घेतला. तसेच संशोधकांचा कामाची प्रशंसा करत त्यांची पाठ थोपटली. गुजरात राज्यातील झायडस कंपनी, पुण्यातीस सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादेतील भारत बायोटेक कंपनीला मोदींनी भेट दिली. यावेळी त्यांनी लस विकासाची सर्व माहिती संशोधकांकडून जाणून घेतली. तसेच सरकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले.

पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला मोदींची भेट

पंतप्रधान मोदी विशेष विमानाने आज दुपारी चार वाजता पुणे विमानतळावर पोहचले. तेथून हेलिकॉप्टरने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीते गेले. सायरस पुनावाला, अदर पुनावाला आणि नताशा पुनावाला यांनी मोदींचे स्वागत केले. तसेच पुनावाला यांच्यासह कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोदींनी बैठक घेतली. अदर पुनावाला पंतप्रधान मोदींना कोरोनावर लस विकसीत करण्यात येत असलेल्या प्रयोगशाळेत घेऊन गेले. कोरोना लस विकासाचे काम कसे सुरू आहे याची सविस्तर माहिती पुनावाला यांनी पंतप्रधानांना दिली. कंपनीच्या संशोधकांनीही मोदींशी संवाद साधत लस निर्मितीवर चर्चा केली. त्यानंतर सुमारे सहा वाजता मोदी पुणे विमानतळावर पोहचले. तेथून विशेष विमानाने पंतप्रधान मोदी दिल्लीकडे रवाना झाले.

मोदींचा व्हॅक्सिन दौरा

झायडस बायोटेक कंपनीला भेट

गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात झायडस बायोटेक कंपनी आहे. ही कंपनी डीएनएवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर करून स्वदेशी लस तयार करण्याचे प्रयत्न करत असून त्यात कंपनीला यशही येत आहे. झायडस कंपनीने कॅडीला या दुसऱ्या एका औषधनिर्मिती कंपनीशी सहकार्य करून संशोधन सुरू केले आहे. मोदींनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. लसीसंदर्भात सर्व माहिती मोदींनी घेतली. लस संशोधनात भारत सरकार फार्मा कंपन्यांना सहकार्य करत असल्याचे मोदी त्यावेळी म्हणाले. ट्विट करून मोदींनी त्यांच्या व्हॅक्सीन दौऱ्याची माहिती दिली.

हैदराबादेतील भारत बायोटेकला मोदींची भेट

गुजरात दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी हैदराबादला आले. तेथे मोदींनी भारत बायोटेक कंपनीला भेट दिली. लस निर्मितीतील प्रगतीवरून त्यांनी संशोधकांचे अभिनंदन केले. लवकर लस तयार होण्यासाठी भारत बायाटेकची टीम आयसीएमआरबरोबर मिळून काम करत आहे.

आसाराम बापूचे समर्थक जमले सीरम कंपनीबाहेर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांनी आज कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये लस निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेतला. दरम्यान, आसाराम बापू यांचे समर्थक सीरम इन्स्टिट्यूट बाहेर जमले होते, त्यातील काही जणांच्या हातात काळे झेंडेही होते. आसाराम बापू यांची सुटका करा, अशी मागणी आंदोलकांची होती. मात्र, पोलिसांनी तत्काळ आंदोलकांना ताब्यात घेतले.

मोदींच्या दौऱ्यावर सुळेंची प्रतिक्रिया

कोविड लस ही पुणेकरांनी शोधली आहे. अन्यथा मीच काढली आहे, असे म्हणायचे नाही, असा खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट नाव न घेता पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. त्या मावळ येथे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरमला भेट देत असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. बाहेरून कोणी कोरोना लसीवर दावा केला, तर असा गैरसमज नसावा, असा टोला सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट नाव न घेता लगावला आहे.

चंद्रकांत पाटलांचे तिखट उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले होते. कोरोना लस निर्मितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यांच्या या दौऱ्याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कामाचे कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत' अशी टिप्पणी केली होती. त्यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी ' सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का?' असा उपरोधिक टोला त्यांना लगावला आहे.

Last Updated : Nov 28, 2020, 9:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.