नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर करार होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याबद्दल अमेरिकेतील भारतीय अमेरिकन समुदायामध्ये मोठा उत्साह आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागताची भव्य तयारी केली आहे. यासोबतच चीन आणि पाकिस्तानही मोदीच्या या भेटीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. वास्तविक, भारत आणि अमेरिका जेवढे जवळ येतात, तितकी चीनची चिंता वाढत जाते. भारतीय पॅसिफिक क्षेत्रात भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व चीनच्या विरोधात वाढत आहे. असे अनेक मुद्दे आहेत, ज्यावर या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये खुली चर्चा होणार आहे.
-
Looking forward to seeing you at the International Day of Yoga celebrations at the UNHQ. Your participation makes the programme even more special.
— Narendra Modi (@narendramodi) June 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Yoga brings the world together towards furthering good health and wellness. May it keep getting more popular globally. https://t.co/QjPUZemOeo
">Looking forward to seeing you at the International Day of Yoga celebrations at the UNHQ. Your participation makes the programme even more special.
— Narendra Modi (@narendramodi) June 16, 2023
Yoga brings the world together towards furthering good health and wellness. May it keep getting more popular globally. https://t.co/QjPUZemOeoLooking forward to seeing you at the International Day of Yoga celebrations at the UNHQ. Your participation makes the programme even more special.
— Narendra Modi (@narendramodi) June 16, 2023
Yoga brings the world together towards furthering good health and wellness. May it keep getting more popular globally. https://t.co/QjPUZemOeo
पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा : परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जून ते 23 जून या कालावधीत अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
- 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार. संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
- 22 जून रोजी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी औपचारिक बैठक.
- 22 जूनच्या रात्री स्टेट डिनर.
- 22 जून रोजी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधन.
- 23 जून दुपारी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबत दुपारचे जेवण.
- 23 जून रोजी प्रमुख कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार.
- 23 जून रोजी भारतीय डायस्पोरा सदस्यांसोबत पंतप्रधानांची बैठक.
- 24 जून रोजी कैरो (इजिप्त) येथे रवाना होतील.
-
WASHINGTON, D.C. – Award-winning International Singer @MaryMillben will make appearances in New York and in Washington, D.C. for the Official State Visit of Prime Minister Narendra Modi of the Republic of India to the United States June 21-23, 2023. Formally invited by Her… pic.twitter.com/FpHGcCMpU5
— Mary Millben (@MaryMillben) June 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">WASHINGTON, D.C. – Award-winning International Singer @MaryMillben will make appearances in New York and in Washington, D.C. for the Official State Visit of Prime Minister Narendra Modi of the Republic of India to the United States June 21-23, 2023. Formally invited by Her… pic.twitter.com/FpHGcCMpU5
— Mary Millben (@MaryMillben) June 18, 2023WASHINGTON, D.C. – Award-winning International Singer @MaryMillben will make appearances in New York and in Washington, D.C. for the Official State Visit of Prime Minister Narendra Modi of the Republic of India to the United States June 21-23, 2023. Formally invited by Her… pic.twitter.com/FpHGcCMpU5
— Mary Millben (@MaryMillben) June 18, 2023
गायिका मेरी मिलबेन करणार परफॉर्म : अमेरिकेची प्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात परफॉर्म करणार आहे. हा कार्यक्रम युनायटेड स्टेट्स इंडियन कम्युनिटी फाउंडेशन (USICF) द्वारे 23 जून रोजी आयोजित केला जात आहे. मिलिबेन आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. 21 जून रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधीने मिलबेनला या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवले आहे. याबाबत मिलबेनला विचारले असता ती म्हणाली की, 'मी या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहे. यासाठी मी खूप उत्साहित आहे'.
'पंतप्रधान मोदींचा हा दौरा भारत आणि अमेरिका या जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधील संबंधांचा उत्सव साजरा करेल. अमेरिकेच्या महासभेच्या अध्यक्षा कसाबा कोरोसी, भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज आणि न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांच्यासह मी पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यास तयार आहे'. - गायिका मेरी मिलबेन
मोदींच्या अमेरिका दौऱ्यात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? : या भेटीबाबत परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात ज्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, त्यात एक द्विपक्षीय संरक्षण सहकार्य असेल. दुसरा प्रमुख मुद्दा भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत व्यापार आणि गुंतवणूक भागीदारी आहे. तिसरा मुद्दा आहे तंत्रज्ञान, दूरसंचार, अवकाश, उत्पादन आणि गुंतवणूक आहे.
- अमेरिकेच्या व्हिसा वर चर्चा. व्हिसाबाबत भारतीयांच्या अडचणी कमी होतील.
- संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा करार. MQ 9B सीगार्डियन ड्रोन खरेदी. सेमीकंडक्टर्सबाबतही महत्त्वाचे करार होणार आहेत.
- कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत नवीन घोषणा.
- मायक्रोन तंत्रज्ञानावर चर्चा.
हेही वाचा :