ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जुलैला केंद्रीय मंत्रिमंडळाची घेणार बैठक

author img

By

Published : Jul 10, 2021, 2:56 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री व केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या बैठकी गुरुवारी घेतल्या आहेत. कोरोनाच्या लढाईत कोणतीही कमतरता राहू नये, अशी सूचना पंतप्रधानांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जुलैला मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा ७ जुलैला विस्तार केल्यानंतर मंत्रिमंडळाची ही दुसरी बैठक असणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री व केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या बैठकी गुरुवारी घेतल्या आहेत. कोरोनाच्या लढाईत कोणतीही कमतरता राहू नये, अशी सूचना पंतप्रधानांनी मंत्र्यांना दिल्या आहेत. गेली काही दिवस मास्क न घातलेल्या लोकांच्या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असल्याचेही पंतप्रधानांनी नवीन मंत्र्यांना सांगितले आहे. लोक कोरोनाच्या काळातील नियम पाळत नसल्याचे चित्र सुखावह नाही, असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

हेही वाचा-'त्या' बुडालेल्या कारच्या बदल्यात मालकाला मिळाली नवी कार

१५ ऑगस्टपर्यंत कोणत्याही नवीन मंत्र्यांनी दिल्ली सोडू नये-

कोरोनाच्या काळात नेते म्हणून सर्व मंत्र्यांनी जबाबदारी ओळखत जल्लोषापासून दूर राहावे, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिल्याचे सुत्राने सांगितले. तसेच १५ ऑगस्टपर्यंत कोणत्याही नवीन मंत्र्यांनी दिल्ली सोडू नये, असेही पंतप्रधानांनी मंत्र्यांना दिलेल्या निर्देशात म्हटले आहे.

हेही वाचा-भाजपमधल्या 'आऊटसोर्स ताई-माई-अक्का आज गायब असतील; उत्तरप्रदेश प्रकरणावरून मंत्री ठाकूर कडाडल्या

केंद्रीय मंत्रिमंडळात नवीन ७ महिलांचा समावेश-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात नवीन सात महिला नेत्यांचा समावेश केला आहे. या समावेशाने मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण ११ महिला मंत्री असणार आहेत. दोन वर्षानंतर अपना दलच्या अनुप्रिया पटेल या मंत्रिमंडळात समावेश आहे. तर सहा महिला नेत्यांचा पहिल्यांदाच मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी सायंकाळी विस्तार करण्यात आला. या विस्तारात १५ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला.

व्यावसायिक पदवी असलेल्या ३६ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यावसायिक पदवी असलेल्या ३६ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. यामध्ये २ माजी आयएएस अधिकारी, ८ वकील, ४ डॉक्टर, ४ एमबीए पदवीधारक आणि काही अभियंत्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील पाच राज्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्रीपदी बढती दिली आहे. त्यांच्याकडे नवीन मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरविस्तारात जुन्या १२ मंत्र्यांना वगळण्यात आले आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.