ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींकडून राम मंदिरावरील टपाल तिकीट जारी - Modi Launches stamp on Ram Mandir

Ram Mandir postage stamp : पंतप्रधान मोदींनी राम मंदिरावरील टपाल तिकीट जारी केलं आहे. यात हनुमान-जटायू साबरीवरील टपाल तिकीटचाही समावेश आहे. यात राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवलराज, माँ शबरी यांच्यावरील टपाल तिकिटांचा समावेश आहे.

PM Modi Launches stamp on Ram Mandir
PM Modi Launches stamp on Ram Mandir
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 7:23 PM IST

नवी दिल्ली Ram Mandir postage stamp : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री रामजन्मभूमी मंदिराच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केलंय. याशिवाय त्यांनी प्रभू श्रीराम यांच्यावर जगभरात प्रसिद्ध झालेल्या तिकीटांचं पुस्तकही प्रकाशित केलं आहे. टपाल तिकिटाच्या डिझाईनमध्ये राम मंदिर, चौपई 'मंगल भवन अमंगल हरी', सूर्य, शरयू नदी तसंच मंदिराभोवतीच्या मूर्तींचा समावेश आहे. भारत तसंच अमेरिकेसह एकूण 21 देशांमध्ये भगवान रामावरील टपाल तिकिटं जारी करण्यात आली आहेत.

  • Prime Minister Narendra Modi releases Commemorative Postage Stamps on Shri Ram Janmbhoomi Mandir and a book of stamps issued on Lord Ram around the world. Components of the design include the Ram Mandir, Choupai 'Mangal Bhavan Amangal Hari', Sun, Sarayu River and Sculptures in… pic.twitter.com/ISBKLFORG4

    — ANI (@ANI) January 18, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एकूण 6 टपाल तिकिटांचा समावेश : पंतप्रधान मोदींच्या हस्ते जारी करण्यात आलेल्या स्टॅम्प्सच्या पुस्तकात 6 तिकिटांचा समावेश करण्यात आला आहे. यात राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवलराज, माँ शबरी यांच्यावरील टपाल तिकिटांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की, 'आज राम मंदिराशी संबंधित 6 टपाल तिकिटं जारी करण्यात आली. तसंच, भगवान श्रीराम यांच्याशी संबंधित टपाल तिकिटांचा अल्बम देखील प्रकाशित करण्यात आला आहे. पीएम मोदींनी जारी केलेल्या पुस्तिकेत 48 पानं आहेत. यामध्ये 20 देशांच्या तिकिटांचा समावेश करण्यात आला आहे. या देशांमध्ये प्रामुख्याने अँटिग्वा, बारबुडा, ऑस्ट्रेलिया, कंबोडिया, कॅनडा, झेक प्रजासत्ताक, फिजी, जिब्राल्टर, गयाना, ग्रेनाडा, इंडोनेशिया, नेपाळ, न्यूझीलंड, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड, अमेरिका देखाचा समावेश करण्यात आला आहे.

22 जानेवारीला होणार प्राणप्रतिष्ठा : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. यावेळी मोदी म्हणाले, "पोस्टल स्टॅम्पचं कार्य आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु पोस्टल स्टॅम्प आणखी एक महत्त्वाची भूमिका बजावतात. टपाल तिकीट ऐतिहासिक प्रसंग पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे."

हे वाचलंत का :

  1. मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यात होऊ शकतो बदल, आता 'या' दिवशी जाणार अयोध्येला
  2. नेदरलँडमध्येही प्रभू श्रीरामाची चलती, चर्च खरेदी करून बांधली राम मंदिरं!
  3. अयोध्येत प्रभू रामाचा लवकरच प्राणप्रतिष्ठापना सोहळा, आज होणार 'ही' विशेष पूजा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.