नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी सकाळी दिल्लीतील रकाबगंज साहिब गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी त्यांनी गुरू तेग बहादुर यांना श्रद्धांजली वाहिली. शनिवारी तेग बहादुर यांची पुण्यतिथी होती, ज्यानिमित्ताने मोदींनी गुरुद्वाराला भेट दिली.
कोणत्याही नियोजनाशिवाय अचानक दिली भेट..
कोणतेही पूर्वनियोजन न करता अचानक मोदींनी गुरुद्वाराला भेट दिली. त्यामुळे, या भेटीदरम्यान कोणताही पोलीस बंदोबस्त करण्यात आला नव्हता, किंवा वाहतूक थांबवण्यासाठीही रस्ते अडवण्यात आले नव्हते अशी माहिती सूत्रांनी दिली.
-
#WATCH | PM Narendra Modi offers prayers at Gurudwara Rakab Ganj Sahib in Delhi. (Source - DD) pic.twitter.com/Ap9MchtdYP
— ANI (@ANI) December 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | PM Narendra Modi offers prayers at Gurudwara Rakab Ganj Sahib in Delhi. (Source - DD) pic.twitter.com/Ap9MchtdYP
— ANI (@ANI) December 20, 2020#WATCH | PM Narendra Modi offers prayers at Gurudwara Rakab Ganj Sahib in Delhi. (Source - DD) pic.twitter.com/Ap9MchtdYP
— ANI (@ANI) December 20, 2020
तेग बहादुर प्रेरणा देतात..
श्री गुरू तेग बहादुर यांचे कार्य जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देते. आज सकाळी या पवित्र ठिकाणी डोके टेकवल्यामुळे मी धन्य झालो असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली.
शेतकरी आंदोलनामुळे भेटीला महत्त्व..
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या २४ दिवसांपासून पंजाब-हरियाणामधील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी या गुरुद्वाराला दिलेली भेट ही महत्वपूर्ण मानली जात आहे. पंतप्रधान मोदी हे वारंवार कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचे सांगत आहेत. मात्र, हे कायदे मागे घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : काँग्रेसच्या अध्यक्षपदी परतण्याचे राहुल गांधींचे संकेत; म्हणाले पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार..