लखनऊ ( उत्तर प्रदेश ) : देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी झेप घेतली आहे. इंडियन एक्सप्रेसने 2022 मधील 100 सर्वात शक्तिशाली व्यक्तींची यादी जाहीर केली ( Most Powerful Peoples In India ) आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव अग्रस्थानी ( PM Modi Most Powerful Person ) आहे. चला जाणून घेऊया यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या नंबरवर आहेत?
क्रमांक 1 नरेंद्र मोदी, पंतप्रधान (2021-1)
क्रमांक 2 अमित शहा, गृहमंत्री (2021-2)
क्रमांक 3 मोहन भागवत, संघप्रमुख (2021-3)
क्रमांक 4 जेपी नड्डा, भाजप अध्यक्ष (2021-4)
क्रमांक 5. मुकेश अंबानी, उद्योगपती (2021-5)
क्रमांक 6 योगी आदित्यनाथ, यूपीचे मुख्यमंत्री (2021-13)
योगी आदित्यनाथ यांनी 2021 मध्ये 13व्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामागील कारण म्हणजे यूपीमध्ये भाजपचा शानदार विजय. 2017 मध्ये भाजपने यूपीमध्ये पीएम मोदींच्या करिष्म्यावर निवडणूक जिंकली होती. मात्र 2022 ची निवडणूक हा योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीवर जनतेचा निर्णय मानला जात आहे. विशेषतः कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने काम केले त्याला लोकांनी दाद दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सातत्याने वाढत असून, देशातील १०० शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत ते अजूनही पहिल्या क्रमांकावर असल्याचे या यादीतून दिसून आले आहे. कोरोना महामारीमुळे उद्भवलेले संकट आणि त्यावरील लसीचे व्यवस्थापन, विधानसभा निवडणुकीत भाजपची मजबूत झालेली स्थिती यामुळे पंतप्रधान मोदींची प्रतिमा उंचावली आहे. याशिवाय, अलीकडेच, युक्रेनमधून 22,000 हून अधिक तरुण भारतीयांना घरी आणण्याच्या पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे कौतुक केले गेले आहे.