हरिद्वार (उत्तराखंड): PM Modi Mother Ashes: गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. आज पीएम मोदींचे भाऊ पंकज मोदी आईच्या अस्थी घेऊन हरिद्वारला पोहोचले. जिथे त्यांनी पूर्ण विधीपूर्वक पूजा करताना अस्थी गंगेत विसर्जित PM Modi mother ashes flow into the Ganga केल्या. त्याचवेळी, पंकज मोदी हरिद्वारमध्ये आल्याची माहिती भाजपच्या एकाही नेत्याला किंवा मंत्र्याला देण्यात आली नाही, त्यामुळे हरिद्वार गंगा घाटावर कोणतीही गर्दी दिसून आली नाही. PM Modi mother Heeraben ashes immersed
अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमाची माहिती ना भाजपच्या एकाही नेत्याला, ना पोलीस किंवा एलआययूला होती. दुपारी बाराच्या सुमारास व्हीआयपी घाटावर पोहोचलेल्या पंकज मोदींनी संपूर्ण विधी आणि मंत्रोच्चार करून आईच्या अस्थिकलशाचे गंगेत विसर्जन केले. अस्थी विसर्जन करून पंकज मोदी हरिद्वारहून परतले. मोठी गोष्ट म्हणजे या अस्थी विसर्जनाच्या वेळी घाटावर कोणतीही झालर किंवा व्हीआयपी मुव्हमेंट दिसली नाही. याबाबत स्थानिक पोलिसांनाही माहिती देण्यात आली नाही.
पीएम मोदींच्या आईच्या अस्थी गंगेत विसर्जित केल्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. शनिवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या अस्थिकलशाचे संपूर्ण विधीपूर्वक गंगेत विसर्जन करण्यात आले. यावेळी गोपनीयतेची विशेष काळजी घेण्यात आली. अस्थी विसर्जन करून पंतप्रधानांचे भाऊ पंकज मोदी परतले.
जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांचे आज पहाटे निधन झाले. त्या अतिशय साधे जीवन जगत होत्या. हिराबा यांनी 100 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्या गांधीनगरमध्ये त्यांचा धाकटा मुलगा पंकज मोदी यांच्या घरी राहत होत्या.
हिराबांना सहा मुले - हिराबाला पाच मुलं आणि एक मुलगी आहे. हिराबा यांचा मोठा मुलगा सोमभाई मोदी हे गुजरातच्या आरोग्य विभागातून निवृत्त अधिकारी आहेत. अमृतभाई मोदी हे लेथ मशीन ऑपरेटरमध्ये काम करायचे. प्रल्हादभाई मोदी हे स्वस्त धान्य दुकान चालवतात. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. पंकज मोदी हे गुजरात सरकारच्या माहिती विभागात कार्यरत आहेत. हिराबा यांना वासंतीबेन नावाची मुलगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मध्यमवर्गीय कुटुंब साधे जीवन जगते हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.