नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक पातळीवर लोकप्रिय नेते म्हणून पाहिले जात असल्याचा भाजपाकडून दावा केला जातो. याला पुष्टी देणार अहवाल कन्सल्टन्सी कंपनी मॉर्निंग कन्सल्टनं प्रसिद्ध केला. या अहवालानुसार पंतप्रधान मोदींना देशातील ७६ टक्के लोकांनी पसंती तर १८ टक्के लोकांनी नापसंती दर्शविलीय.
जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेत मेक्सिकोचे राष्ट्रपती एंड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत स्वित्झर्लंडचे राष्ट्रपती एलेन बर्सेट तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना ५८ टक्के लोकांनी पसंती दर्शविली. विशेष म्हणजे जागतिक पातळीवर प्रभावशाली असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना अमेरिकेतील केवळ ३७ टक्के लोकांनी पसंती दर्शविली. तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना ३१ टक्के, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सनक यांना २५ टक्के, फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांना २४ टक्के पसंती दर्शविली आहे.
-
NEW: Global Leader Approval: *Among all adults
— Morning Consult (@MorningConsult) December 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Modi: 76%
López Obrador: 66%
Lula da Silva: 49%
Albanese: 47%
Meloni: 41%
Biden: 37%
Sánchez: 37%
Trudeau: 31%
Sunak: 25%
Macron: 24%
Scholz: 21%
*Updated 12/7/23https://t.co/Qxc6HbLPz4 pic.twitter.com/IK0niZPdso
">NEW: Global Leader Approval: *Among all adults
— Morning Consult (@MorningConsult) December 8, 2023
Modi: 76%
López Obrador: 66%
Lula da Silva: 49%
Albanese: 47%
Meloni: 41%
Biden: 37%
Sánchez: 37%
Trudeau: 31%
Sunak: 25%
Macron: 24%
Scholz: 21%
*Updated 12/7/23https://t.co/Qxc6HbLPz4 pic.twitter.com/IK0niZPdsoNEW: Global Leader Approval: *Among all adults
— Morning Consult (@MorningConsult) December 8, 2023
Modi: 76%
López Obrador: 66%
Lula da Silva: 49%
Albanese: 47%
Meloni: 41%
Biden: 37%
Sánchez: 37%
Trudeau: 31%
Sunak: 25%
Macron: 24%
Scholz: 21%
*Updated 12/7/23https://t.co/Qxc6HbLPz4 pic.twitter.com/IK0niZPdso
मोदींचा लोकप्रियतेत प्रथम क्रमांक असलेल्या सर्वेक्षणावर भाजपाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मोदी यांची गॅरंटी आणि मोदींच्या जादूला आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानंही समर्थन दिल्याचं भाजपा नेत्यांनी म्हटलं. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता शहजाद पूनावाला म्हणाले, पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणातही मोदींच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या काळातही लोकप्रियतेचे उच्च मानांकन मिळाले होते. तेव्हा जगभरातील नेत्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. पंतप्रधान मोदींनी महागाईवर नियंत्रण आणत १३.५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. तसेच सर्वांचा विकास केला आहे. पंतप्रधान मोदींची ही लोकप्रियता २०२४ मधील लोकसभा निवडणुकीतही दिसून येणार आहे.- भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता शहजाद पूनावाला
सर्वेक्षणावर वापरकर्त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया- कंपनीच्या एक्सवरील सर्वेक्षणाच्या पोस्टवर वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. १८ टक्के लोकांनी मोदींना नापसंती दिलेले ही विरोधी पक्षांचे नेतेच आहेत, अशी एका वापरकर्त्यानं प्रतिक्रिया दिली. १४० कोटींची लोकसंख्या असलेल्या भारतात ७६ टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींना पसंती दर्शविली. तर १३ कोटी लोकसंख्या असलेल्या मेकिस्कोत राष्ट्रपतीला ६६ टक्के पसंती कशी मिळाली? त्यामुळे जागतिक नेते ओब्राडोर आहेत की मोदी असा प्रश्न एका वापरकर्त्यानं विचारला आहे. तर एका वापरकर्त्यानं मॉर्निग कन्सल्टंट कंपनी ही उजव्या विचारसरणीच्या संस्थेशी निगडीत असल्याचा दावा केला आहे. ही कंपनी लाच घेऊन सकारात्मक सर्वेक्षण दाखवू शकते, असाही दावा केला आहे. मोदी सरकारला अजूनही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये लोकप्रिय नेता मुख्यमंत्रीपदासाठी निवडता आला नाही, याकडं वापरकर्त्यानं लक्ष वेधले.
- काय काम करते मॉर्निंग कन्सल्ट कंपनी- मॉर्निंग कन्सल्ट कंपनी ही अमेरिकेची डाटा कंपनी असून विविध सर्वेक्षणाचं करते. या कंपनीनं यापूर्वीदेखील जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. जगात सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या कंपनीत मॉर्निंग कन्सल्ट कंपनीचा समावेश आहे.
हेही वाचा-