ETV Bharat / bharat

Time Influential List: टाईमच्या जगातील 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत मोदी, ममता बॅनर्जी अन् आदर पूनावाला

टाईम मासिकने 2021 च्या 100 प्रभावशाली लोकांची यादी जाहीर केली आहे. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांच्या नावाचाही समावेश आहे. टाईम मॅग्झिनने बुधवारी ही यादी प्रसिद्ध केली.

modi
modi
author img

By

Published : Sep 16, 2021, 1:04 PM IST

न्यू यॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांची टाईम मासिकाद्वारे 2021 च्या जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये नावे आहेत.

टाईम मासिकाने बुधवारी (15 सप्टेंबर) '2021 च्या 100 सर्वात प्रभावशाली लोकांची' वार्षिक यादी जाहीर केली. ही जागतिक यादी आहे. ज्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, उपाध्यक्ष कमला हॅरिस, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि मेघन, माजी यूएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तालिबानचे सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरदार यांचा समावेश आहे.

'मोदीनंतर कोणीही नाही'

टाईम मासिकातील मोदींच्या प्रोफाईलवर लिहिले आहे, की 'एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपल्या 74 वर्षात भारताला जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि मोदी हे तीन प्रमुख नेते होते. नरेंद्र मोदी हे तिसरे आहेत. देशाच्या राजकारणावर त्यांचे वर्चस्व आहे, जसे त्यांच्यानंतर कोणीही नाही'.

'मोदींनी देशाला धर्मनिरपेक्षतेकडून हिंदू राष्ट्रवादाकडे ढकलले'

सीएनएनचे प्रख्यात पत्रकार फरीद झकारिया यांनी लिहिलेल्या एका प्रोफाईलमध्ये 'मोदींनी देशाला धर्मनिरपेक्षतेपासून हिंदू राष्ट्रवादाकडे ढकलल्याचा' आरोप केला आहे.

मोदींवर आरोप

तसेच 69 वर्षीय नेत्यावर "भारताच्या मुस्लिम अल्पसंख्यांकांचे अधिकार हिरावून घेतल्याबद्दल आणि पत्रकारांना तुरुंगात टाकण्याची आणि धमकावल्याचा आरोप फरीद झकारिया यांनी केला आहे.

ममता बॅनर्जींचा चेहरा उग्र?

तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल असे लिहिले, की "100 सर्वात प्रभावशाली यादीतील ममतांचे प्रोफाईल सांगते की 66 वर्षीय नेते "भारतीय राजकारणात उग्रतेचा चेहरा बनले आहेत."

"बॅनर्जी यांच्याबद्दल असे म्हटले जाते, की त्या त्यांच्या पक्षाचे नेतृत्व करत नाहीत. तृणमूल काँग्रेस- ती एक पार्टी आहे. पितृसत्ताक संस्कृतीत रस्त्यावरची लढाऊ भावना आणि स्वयंनिर्मित जीवन त्यांना वेगळे करते", असे प्रोफाईलवर लिहिले आहे.

टाईम मासिकमधील आदर पूनावालांच्या प्रोफाईलवर म्हटले आहे, की कोविड साथीच्या प्रारंभापासून जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात लस उत्पादनाचे काम केले.

"साथीचा रोग अजून संपलेला नाही आणि पूनावाला अजूनही ते संपवण्यास मदत करू शकतात. लसीतील असमानता तीव्र आहे आणि जगाच्या एका भागात लसीकरणात विलंब झाल्यास जागतिक परिणाम होऊ शकतात, ज्यामध्ये अधिक धोकादायक प्रकारांचा धोका उद्भवू शकतो," असे ते म्हणतात.

टाईम मासिकात तालिबानचे सह-संस्थापक बरदार यांचे वर्णन करण्यात आले आहे. "शांत, गुप्त माणूस जो क्वचितच सार्वजनिक वक्तव्ये किंवा मुलाखती देतो", असे टाईमने बरदारबद्दल म्हटले आहे.

"बरदार तरीही तालिबानमध्ये अधिक मध्यम प्रवाह दर्शवतो. ज्याला पाश्चिमात्य पाठिंबा मिळवण्यासाठी प्रकाशझोतात आणले जाईल आणि आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. प्रश्न असा आहे की ज्याने अमेरिकन लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढले तो स्वतःच्या हालचालीवर मात करू शकतो का?", असे बरदार यांच्या प्रोफाईलवर लिहिले आहे.

या यादीमध्ये टेनिसपटू नाओमी ओसाका, रशियन विरोधी कार्यकर्ते अलेक्सी नाव्हलनी, म्युझिक आयकन ब्रिटनी स्पीयर्स, एशियन पॅसिफिक पॉलिसी आणि प्लॅनिंग कौन्सिलचे कार्यकारी संचालक मंजुषा पी यांचेही नाव आहे.

हेही वाचा - संशयित दहशतवादी ओसामाने पाकिस्तानात घेतले 15 दिवस प्रशिक्षण; बापासह काकानेही केली मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.