ETV Bharat / bharat

E RUPI पंतप्रधानांनी लाँच केले डिजीटल रोकडविरहित नवे माध्यम - Modi launches e RUPI

देशात डिजीटल गव्हर्न्सला महत्त्वाचे स्थान देत आहे. ई-रुपी व्हाउचर हे डिजीटचल व्यवहार आणि थेट लाभ हस्तांतरण अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

author img

By

Published : Aug 2, 2021, 6:21 PM IST

नवी दिल्ली - ई-रुपी डिजीटल देयक व्यवहाराला (e-RUPI digital payment) आजपासून सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-रुपीचे लाँचिंग केले आहे. ई-रुपीच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक व्हाउचवर आधारित डिजीटल देयक व्यवहार यंत्रणा अधिक पारदर्शी असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की ई-रुपी व्हाउचरचा वापर हा खासगी आणि विविध संस्थांकडून केला जाऊ शकतो. ही वैयक्तिक केंद्रित आहे. ज्या उद्देशाने रक्कम दिली आहे, त्याच कामासाठी वापर होणे या कार्डमुळे होऊ शकते. गरिबांना मदत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाकडे पाहिले जात आहे. त्यामुळे पारदर्शकता येण्यास मदत होत आहे. केंद्र सरकारकडून 300 योजनांमधून लाभार्थ्यांना थेट निधी हस्तांरित करण्यात येतो. यामध्ये एलपीजी आदींचा समावेश आहे.

हेही वाचा-महापुराबाबत राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी दुरगामी विचार करून आराखडा तयार करणार - मुख्यमंत्री

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

  • देशात डिजीटल गव्हर्न्सला महत्त्वाचे स्थान देत आहे. ई-रुपी व्हाउचर हे डिजीटचल व्यवहार आणि थेट लाभ हस्तांतरण अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. योग्य ठिकाणी, पारदर्शी आणि गळती विरहित मोफत डिलिव्हरी करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.
  • सरकारच नव्हे तर कोणतीही सामान्य संस्था किंवा संघटना ही शिक्षण किंवा कोणत्याही इतर कामात मदत करू इच्छित असेल तरी संस्था ही रकमेऐवजी ईरुपीचा वापर करू शकणार आहे.
  • देशातील काही लोक तंत्रज्ञानाचा वापर हा केवळ श्रीमंतासाठी असल्याचे म्हणत होते. भारत गरिबांचा देश आहे, तेव्हा भारताला तंत्रज्ञानाची गरज काय, असे विचारण्यात येत होते. मात्र सरकारने तंत्रज्ञानाला मिशन करण्याचे निश्चित केल्यानंतर काही राजकीय नेते आणि काही तज्ज्ञांनी सवाल उपस्थित केले होते.
  • तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आणि त्याचा वापर करण्यात भारत मागे राहिलेला नाही.
  • नवसंशोधन असो की सेवा क्षेत्रातील डिलिव्हरी तंत्रज्ञानाचा वापर, भारत हा जगातील बड्या देशांबरोबर जागतिक नेतृत्व करण्याची क्षमता बाळगून आहे.

हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ई-रुपी लाँच, जाणून घ्या, डिजीटल देयकाबाबतची सविस्तर माहिती

गतवर्षी लाभार्थ्यांना मदत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती यापूर्वी पंतप्रधान कार्यालयाने दिली होती. सरकार आणि लाभार्थ्यांमधील अंतर कमी करण्याकरिता इलेक्ट्रॉनिक व्हाउचर आणण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.