ETV Bharat / bharat

World Dairy Summit: जागतिक डेअरी समिटचे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन; 48 वर्षांनंतर यजमानपद

author img

By

Published : Sep 12, 2022, 3:36 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवार (दि. 12 सप्टेंबर)रोजी इंडिया एक्स्पो मार्ट येथे जागतिक डेअरी समिटचे उद्घाटन केले. भारत 48 वर्षांनंतर या परिषदेचे आयोजन करत आहे. (World Dairy Summit In Noida) 1974 मध्ये भारतात पहिली जागतिक दुग्ध परिषद आयोजित करण्यात आली होती.

जागतिक डेअरी समिटचे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया एक्स्पो मार्ट येथे जागतिक डेअरी समिटचे उद्घाटन केले. या संदर्भात रविवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्स्पो मार्ट येथे पोहोचून सुरक्षेचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10:20 वाजता एक्स्पो मार्टच्या हेलिपॅडवर पोहोचले आणि त्यानंतर एक्स्पो मार्ट येथे आयोजित जागतिक डेअरी समिटचे उद्घाटन केले. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्यासह अनेक बडे नेते या कार्यक्रमात सामील होते.

1974 मध्ये भारतात पहिली जागतिक दुग्ध परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर 48 वर्षांनंतर दुसऱ्यांदा भारताला यजमानपदाची संधी मिळाली आहे. वर्ल्ड डेअरी समिटमध्ये सुमारे 40 देशांतील लोक सहभागी होतील, ज्यामध्ये भारतातील 1200 आणि 300 परदेशी प्रतिनिधींचा समावेश असेल. जागतिक डेअरी समिटमध्ये भारतातील 800 शेतकऱ्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. डेअरी उद्योगाशी संबंधित देश-विदेशातील सुमारे 1500 लोक या व्यवसायावर आपली मते मांडतील आणि उद्योग वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा करतील.

भारतात, सुमारे 8 कोटी शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात, ज्यांची उपजीविका दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. अशा 80 शेतकर्‍यांचा या परिषदेत सहभाग असणार आहे ज्यांनी दूध व्यवसायात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमात सहभागी सर्व लोक दुग्ध व्यवसायाला पुढे नेण्यासाठी आणि त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी आपापसात कल्पना सामायिक करतील.

इंडिया एक्स्पो मार्ट येथे 11 हॉलमध्ये वर्ल्ड डेअरी समिटचे आयोजन केले जाईल. या सर्व सभागृहांना गीर, साहिवाल आणि थारपारकरसह इतर गायींच्या प्रजातींच्या नावावरून नावे देण्यात आली आहेत. गीर गायीचे नाव असलेल्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील नोएडाला भेट देतील आणि रात्री 8 वाजता गृहमंत्री अमित शाह इंडिया एक्स्पो मार्ट येथे पोहोचतील आणि जागतिक डेअरी समिटला उपस्थित राहतील. त्यादृष्टीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे जिल्ह्यातच उपस्थित राहणार असून, रात्री ८ वाजता इंडिया एक्स्पो मार्ट येथे गृहमंत्र्यांचे स्वागत करणार आहेत.

भारतात दरवर्षी 210 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते. दुग्धव्यवसाय क्षेत्रात संपूर्ण जगाचा विकास दर ३% असताना भारतात हा विकास दर ६% आहे. या दरामुळे भारत जगातील दुग्धव्यवसाय क्षेत्रात आघाडीवर आहे. जगात जिथे प्रति व्यक्ती ३१० ग्रॅम दुधाची उपलब्धता आहे, तिथे भारतात हे प्रमाण ४२७ ग्रॅम प्रति व्यक्ती आहे. दूध हा देशातील एकमेव सर्वात मोठा कृषी माल आहे, ज्याची किंमत 9.32 लाख कोटी रुपये आहे. यामुळे जागतिक स्तरावर भारताचा दूध उत्पादनाचा वाटा 23% आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.