बेंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारताच्या द्विवार्षिक एरोस्पेस प्रदर्शन एरो इंडियाचे उद्घाटन करायला पोहचले आहेत. 'एरो इंडिया' भारताचे लष्करी विमाने, हेलिकॉप्टर, संरक्षण उपकरणे आणि नवीन युगातील एव्हीओनिक्स निर्मितीसाठी एक उदयोन्मुख केंद्र म्हणून प्रदर्शन करेल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाच दिवसीय प्रदर्शनात 98 देशांतील 809 संरक्षण कंपन्या आणि प्रतिनिधी सहभागी होतील. बंगळुरूच्या बाहेरील हवाई दलाच्या येलाहंका लष्करी तळाच्या परिसरात हे प्रदर्शन होणार आहे.
-
Karnataka | Prime Minister Narendra Modi at the 14th edition of #AeroIndia2023 at Air Force Station, Yelahanka in Bengaluru. pic.twitter.com/sloe3vrAhZ
— ANI (@ANI) February 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Karnataka | Prime Minister Narendra Modi at the 14th edition of #AeroIndia2023 at Air Force Station, Yelahanka in Bengaluru. pic.twitter.com/sloe3vrAhZ
— ANI (@ANI) February 13, 2023Karnataka | Prime Minister Narendra Modi at the 14th edition of #AeroIndia2023 at Air Force Station, Yelahanka in Bengaluru. pic.twitter.com/sloe3vrAhZ
— ANI (@ANI) February 13, 2023
75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक : एरो इंडिया मध्ये सुमारे 250 बिझनेस-टू-बिझनेस करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सुमारे 75,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, एरो इंडियाच्या 14 व्या आवृत्तीची थीम 'द रनवे टू ए बिलियन अपॉर्चुनिटीज' आहे. एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील क्षमतांमध्ये देशाच्या वाढीचे प्रदर्शन करून सशक्त आणि स्वावलंबी 'न्यू इंडिया'च्या उदयास प्रोत्साहन देणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे.
'आत्मनिर्भर भारत' साकारण्यावर भर : सरकारच्या 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' या संकल्पनेनुसार स्वदेशी उपकरणे आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आणि विदेशी कंपन्यांसोबत भागीदारी करण्यावर या प्रदर्शनात भर दिला जाईल. एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, 'एरो इंडिया-2023' देशाची उत्पादन क्षमता आणि पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतील 'आत्मनिर्भर भारत' साकार करण्याच्या दिशेने केलेली प्रगती अधोरेखित करेल.
बेंगळुरू एरोस्पेसचे जागतिक केंद्र : एरोस्पेस आणि एव्हिएशन क्षेत्राच्या विकासात हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे ते म्हणाले. राजनाथ सिंह म्हणाले की, एरो इंडिया भारतातील एरोस्पेस क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासात उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि देशाचे संरक्षण उत्पादनात स्वावलंबी होण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करेल. संरक्षण मंत्री म्हणाले, 'मला विश्वास आहे की बेंगळुरू हे एरोस्पेस क्षेत्रासाठी जागतिक केंद्र म्हणून उदयास येईल. एक उत्कृष्ट संरक्षण उत्पादन परिसंस्था निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.
हेलिकॉप्टर उत्पादन युनिटचे उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी 6 फेब्रुवारीला कर्नाटकातील तुमाकुरू जिल्ह्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या देशातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर उत्पादन युनिटचे उद्घाटन केले होते. बेंगळुरू मुख्यालय असलेल्या एचएएलने गुब्बी तालुक्यातील या कारखान्यात 20 वर्षांच्या कालावधीत 3-15 टन रेंजमध्ये 1,000 हून अधिक हेलिकॉप्टर तयार करण्याची योजना आखली आहे, ज्याची एकूण उलाढाल 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
हेही वाचा : World Radio Day 2023 : सोशल मीडियाच्या धामधुमीत रेडिओने टिकवले आपले अस्तित्व, वाचा सविस्तर