ETV Bharat / bharat

PM Modi Inaugurate Namo Bharat Rail : देशातील पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; काय आहेत या रेल्वेची वैशिष्ट्ये?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 11:03 AM IST

Updated : Oct 20, 2023, 12:37 PM IST

PM Modi Inaugurate Namo Bharat Rail : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गाझियाबादमध्ये देशातील पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वेचे उद्घाटन करणार आहेत. ही रॅपिड रेल्वे साहिबााबाद आणि दुहाई दरम्यान 17 किलोमीटरचे अंतर कापणार आहे.

PM Modi Inaugurate Namo Bharat Rail
PM Modi Inaugurate Namo Bharat Rail

गाझियाबाद PM Modi Inaugurate Namo Bharat Rail : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गाझियाबादमध्ये देशातील पहिली रॅपिड रेल्वे 'नमो भारत'ला हिरवा झेंडा दाखवतील. दिल्ली आणि मेरठ दरम्यान 82 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर बनवला जात आहे. या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यात ही ट्रेन साहिबााबाद ते दुहाई दरम्यान 17 किलोमीटरचं अंतर कापेल. उद्घाटनानंतर २१ ऑक्टोबरपासून लोकांना यातून प्रवास करता येणार आहे. नमो भारत ट्रेन 2025 पर्यंत दिल्लीतील सराय काले खान आणि मेरठमधील मादीपुरम या स्टेशन दरम्यान धावेल. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या आठवड्यात या रेल्वेच्या उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली होती. ही रॅपिड ट्रेन गुलधर मार्गे गाझियाबाद सुमारे 17 मिनिटांत दुहाई डेपोला पोहोचेल. 'नमो भारत' ही मुंबईतील मोनो आणि दिल्ली-एनसीआर मेट्रोपेक्षा खूपच वेगळी असल्याचं म्हटलं जातंय.

  • #WATCH | Sahibabad, Uttar Pradesh | Prime Minister Narendra Modi flags off the RapidX train connecting Sahibabad to Duhai depot, marking the launch of Regional Rapid Transit System (RRTS) in India. This is India’s first RapidX train which will be known as NaMo Bharat. pic.twitter.com/YaanYmocB8

    — ANI (@ANI) October 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोनो रेल आणि मेट्रोपेक्षा रॅपिड रेल चांगली : मुंबईत धावणारी मोनो रेल, दिल्ली-एनसीआरची मेट्रो आणि नमो भारत रॅपिड रेलमध्ये खूप फरक आहे. या रेल्वेमध्ये वेगाचा मोठा फरक आहे. वेगाच्या बाबतीत, रॅपिड रेल दोन्ही प्रकारच्या मेट्रो (मोनो आणि मेट्रो) पेक्षा वेगवान आहे. रॅपिड रेल्वे ताशी 180 किलोमीटर वेगानं धावू शकते. त्याची रचनाही चांगली आहे. याद्वारे तुम्ही दिल्ली ते मेरठ हा प्रवास अवघ्या एका तासाचा होणार आहे.

रॅपिड रेल्वेच्या डब्यांमध्ये अनेक सुविधा : रॅपिड रेल्वेच्या डब्यांमध्येही अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतील. यात मोफत वाय-फाय, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स, सामान ठेवण्याची जागा आणि इन्फोटेनमेंट सिस्टिमची व्यवस्था आहे. मेट्रोमध्ये स्मार्ट कार्ड, टोकन, क्यूआर कोड असलेले कागद आणि अ‍ॅपवरून तयार केलेल्या तिकिटांच्या माध्यमातून प्रवेश मिळतो. तर रॅपिड रेल्वेसाठी डिजिटल पेपर आणि क्यूआर कोड असलेले पेपर तिकीट वापरण्यात येणार आहे.

हेही वाचा :

  1. Pramod Mahajan Skill Development Centers : राज्यातील 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार उद्घाटन
  2. Global Maritime India Summit 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'अमृत काल व्हिजन 2047' चं अनावरण
  3. Vande Bharat Train : देशातील 11 राज्यांना गिफ्ट! पंतप्रधान मोदींच्या हस्ते नऊ वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण

Last Updated : Oct 20, 2023, 12:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.