ETV Bharat / bharat

PM Modi: माझी कबर खोदण्यात देशातीलच नाही तर परदेशातील लोकांचाही सहभाग -पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवार (1 एप्रिल)रोजी मध्य प्रदेशच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. भोपाळच्या कमलापती रेल्वे स्थानकावर पंतप्रधान मोदींनी वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

PM Modi
PM Modi
author img

By

Published : Apr 1, 2023, 8:02 PM IST

भोपाळ (मध्य प्रदेश) : भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर खासदारांना पहिली वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. यावेळी सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. एका व्यक्तीची प्रतिमा सुधारण्यासाठी माझ्याविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या लोकांना माझी कबर खणायची आहे कारण त्यांना देशात होत असलेली विकासकामे सहन होत नाहीत असेही ते म्हणाले आहेत.

परदेशात माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न : पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी माझ्याविरोधात विविध प्रकारच्या खोड्या केल्या जात आहेत आणि अपप्रचार केला जात आहे. आज आपल्या देशात असे अनेक लोक आहेत ज्यांनी देशातच नव्हे तर परदेशातही मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा विडा उचलला आहे असा आरोपही त्यांनी यावेली केला आहे. यांना माझी कबर खणायची आहे. त्यासाठी सर्व शस्त्रांचा वापर केला जात आहे. या लोकांनी मोदींच्या विरोधात सुपारी दिली आहे, त्यात भारतच नाही तर परदेशीही सामील झाले आहेत. परदेशात बसलेले लोक माझी प्रतिमा खराब करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

देशातील जनता माझी सुरक्षा कवच आहे: पंतप्रधान मोदी म्हणाले की, या देशातील सामान्य नागरिक माझी सुरक्षा कवच बनला आहे, ज्यामध्ये दलित आणि सर्व धर्माच्या लोकांचा समावेश आहे. माझे विरोधक उन्मादात आहेत आणि त्यांनी सतत माझ्याविरुद्ध अजेंडा सुरू केला आहे. माझी कबर खोदणे हा त्यांचा उद्देश आहे. राष्ट्र घडवणे हे माझे ध्येय आहे. हे लोक मला माझ्या कामापासून दूर करू शकत नाहीत. देशाचा विकास करण्याच्या माझ्या संकल्पावर मी ठाम आहे आणि या दिशेने अहोरात्र काम करत आहे. काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, या लोकांना काही काम नाही.

हेही वाचा : Mahua Moitra: 'हिंदूंना धोका आहे' असे म्हणत भाजपची 2024 ची तयारी, महुआ मोईत्रांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.