ETV Bharat / bharat

PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडीला दिला 7.5 कॅरेटचा हिरा भेट - PRIME MINISTER GIFTS THESE THINGS

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यावर अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बिडेन यांना खास हिरा भेट दिला आहे. हा मानवनिर्मित हिरा 7.5 कॅरेटचा असून त्यावर सुरतमध्ये पैलू पाडण्यात आले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा हिरा लॅबमध्ये तयार केलेला हिरा आहे.

PM Modi US Visit
PM Modi US Visit
author img

By

Published : Jun 22, 2023, 4:25 PM IST

वाशिंगटन डीसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेला हिरा सुरत येथील ग्रीन लॅब डायमंड कंपनीत तयार करण्यात आला आहे. प्रयोगशाळेत हिरा बनवण्यासाठी सुमारे 2 महिने कालावधी लागला आहे, असे स्मिथ पटेल म्हणाले. हिऱ्याच्या पॉलिशिंगचे काम सुरतमध्येच झाले होते. हा हिरा पंतप्रधानांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडीला दिला, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना भारताच्या काही खास गोष्टी भेट दिल्या आहेत. यासोबत जो बिडेन यांनी पंतप्रधान मोदींना काही भेटवस्तूही दिल्या. मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना पंजाबचे तूप, राजस्थानातून हाताने बनवलेले 24 कॅरेटचे हॉलमार्क असलेले सोन्याचे नाणे यांसह अनेक भेटवस्तू दिल्या आहेत.

  • PM Narendra Modi gifts a lab-grown 7.5-carat green diamond to US First Lady Dr Jill Biden

    The diamond reflects earth-mined diamonds’ chemical and optical properties. It is also eco-friendly, as eco-diversified resources like solar and wind power were used in its making. pic.twitter.com/5A7EzTcpeL

    — ANI (@ANI) June 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इको-फ्रेंडली डायमंड : हा हिरा नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत तयार केला जातो. त्याला पर्यावरणपूरक हिरा म्हणतात. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवानिमित्त, पंतप्रधानांनी हा हिरा अमेरिकेच्या फर्स्ट लेडीला भेट दिला. दोन महिन्यांच्या मेहनतीनंतर तयार झालेला हिरा पंतप्रधानांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडीला दिल्याने ही सुरतसाठी अभिमानाची बाब असल्याचे पटेल म्हणाले.

'ही केवळ सुरतसाठीच नाही तर देशासाठी अभिमानाची बाब आहे. याला सेल्फ मेड हिरा म्हणतात. हा हिरा सुरतमध्ये बनवला जातो आणि कट पॉलिश केला जातो. या हिऱ्याला जगभरात मागणी आहे. हिरे रसायनांपासून बनवलेले असून ते पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत. हिरे प्रयोगशाळेत तयार केले जातात. हे हिरे नैसर्गिक हिऱ्यांसारखे आहेत. त्याचे सर्व गुण समान आहेत. हिरे बनवण्यासाठी आपण सौर आणि पवन ऊर्जा वापरतो. यामुळे निसर्गाचीही हानी होत नाही.' -स्मित पटेल, प्रवक्ते, जीजेईपीसी इंडिया

आत्मनिर्भरतेचे उदाहरणः ते पुढे म्हणाले की अमृत मोहोत्सवाला ७.५ कॅरेटचा हिरा देण्यात आला आहे. या उद्योगातून लाखो लोकांना रोजगार मिळतो. तसेच, भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी हे खूप चांगले क्षेत्र आहे. हे हिरे देशातच बनवले जातात. हिरे देशातच पॉलिश केले जातात. त्यानंतर विविध दागिने देशातच बनवले जातात.हे हिरे प्रयोगशाळेत तयार होण्यासाठी अनेक महिने लागतात. प्रयोगशाळेत हिरा तयार केल्यानंतर तो उत्कृष्टपणे कापून पॉलिश केला जातो. लॅबग्राउन डायमंड हे आत्मनिर्भर भारताचे उत्तम उदाहरण ठरू शकते, यासाठी पंतप्रधान मोदींनी आदेश दिले आहेत.

हेही वाचा - International Yoga Day : पंतप्रधान मोदी यांनी केला संयुक्त राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा, पहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.