नवी दिल्ली - सरकार आणि उद्योगांमध्ये सहकार्य बळकट झाले आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर उंचावत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते भारतीय औद्योगिक महासंघाच्या (CII) कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.
भारतीय औद्योगिक महासंघाने 'India@75 सरकार आणि उद्योग हे आत्मनिर्भर भारतासाठी एकत्रित काम करत आहेत' या संकल्पनेवर वार्षिक बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की उद्योगांमधील सर्व मित्र आणि संस्था या देशाच्या विकासाचा महत्त्वाचा घटक आहे. तुमच्या सोबतच्या प्रयत्नाने भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा वेग घेत आहे.
हेही वाचा-OBC LIST : 127 व्या घटना दुरुस्तीचे विधेयक राज्यसभेत मंजूर, सभागृहात 'अशी' झाली चर्चा
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, की देश हा उद्योगानुकलतेचे मानांकन आणि विदेशी गुंतवणुकीमध्ये झेप घेत आहे. नवा भारत हा तयार आहे. नवीन जगामध्ये विकास करण्यासाठी बांधील आहे. विदेशी गुंतवणुकीने भयभीत असलेला भारत आज सर्व प्रकारच्या गुंतवणुकीचे स्वागत करत आहे. भारताने धाडसी निर्णय घेतले आहेत. कोरोना महामारीच्या काळात सुधारणा सुरुच राहणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
हेही वाचा-बळीराजाची चिंता वाढली! 15 तारखेपर्यंत पावसाची शक्यता धूसर!
कोरोनाच्या काळात मास्क ते ऑक्सिजन अशा प्रत्येक मार्गावर उद्योगाने पुढे येऊन मदत केली आहे. उद्योगाने भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उद्योगांनी अधिक गुंतवणूक करून आत्मनिर्भर भारत अभियांतर्गत रोजगार निर्मितीत वाढ करावी, असे पंतप्रधानांनी आवाहन केले.
हेही वाचा-स्मार्ट राखीसह साजरा करा रक्षाबंधन! गुजरातमधील तरुणीने तयार केलेल्या राखीला देशासह परदेशातही मागणी!