नोएडा/नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मेलवर माहिती मिळताच खासगी वृत्तवाहिनीच्या सीईओने नोएडाच्या सेक्टर-20 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेबाबत अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. एका तरुणाने पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी एका खासगी वृत्तवाहिनीच्या सीएफओला मेल केली होती.
धमकी देणारा ईमेल: सेक्टर-20 पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात कार्तिक सिंह नावाच्या तरुणाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र लिहिल्याचे म्हटले आहे. खाजगी वृत्तवाहिनीच्या सीईओने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नोएडाच्या सेक्टर 20 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पथके आरोपींचा शोध घेत आहेत.
काही जणांना घेतले ताब्यात: सेक्टर 20 चे पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक मनोज कुमार सिंह म्हणतात की सीईओने दिलेल्या तक्रारीच्या आधारे अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. लवकरच धमकी देणाऱ्या आरोपींना अटक करण्यात येईल. पोलिसांनी धमकीप्रकरणी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
मोदींना यापूर्वीही मिळाली आहे धमकी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दाऊदच्या गुंडांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पंतप्रधान मोदीं यांची हत्या करण्याचा कट अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे गुंड रचत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना त्यावेळी मिळाली होती. मुंबई वाहतूक पोलिसांच्या क्रमांकावर धमकी असलेला एक ऑडिओ मेसेज आला आहे. तसेच गेल्या वर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्याबाबत मुंबईतील एनआयए शाखेत यासंदर्भात एक मेल आला होता. याप्रकरणीही पोलिसांनी त्यावेळी कारवाई केली होती.
हेही वाचा: मोदींच्या काळातील प्रगती, वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन