दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) मन की बात ( Mann Ki Baat ) कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी 11 वाजता देशातील जनतेशी संवाद साधतात. मात्र, आज या वेळेत बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी आज सकाळी 11.30 वाजता जनतेशी संवाद साधतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यलयाने दिली आहे.
पंतप्रधान कार्यलयाने सांगितले की, मन की बात कार्यक्रम हा 11 वाजता प्रसारित होतो. मात्र, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी असल्याने त्यांना श्रद्धांजली वाहून पंतप्रधान मोदी 11.30 वाजता जनतेला संबोधित करणार आहे. तसेच, 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याबाबतही पंतप्रधान मोदी बोलण्याची शक्यता आहे.
2014 पासून 'मन की बात'
ऑक्टोबर 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा मन की बातला सुरुवात केली होती. त्यानंतर ते महिन्याच्या अखेरच्या रविवारी मनकी बात द्वारे संवाद साधतात. यामाध्यमातून ते देशांतील जनतेशी अनेक मुद्द्यांवर भाष्य करतात.
हेही वाचा- Jammu And Kashmir : सुरक्षा दलाकडून 12 तासांत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान