नवी दिल्ली - पंतप्रधान आज रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरुन ‘मन की बात’ कार्यक्रमद्वारे देशविदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 79 वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून, तसंच ww.newsonair.com हे संकेतस्थळ आणि newsonair या मोबाईल अॅपवरून या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.
विशेष म्हणजे, गेल्या सात वर्षांपासून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पीएम मोदी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विषय आणि मुद्द्यांवर आपले मत मांडतात. तसेच देशाच्या विकासात किंवा समाजाच्या उन्नतीत योगदान देणार्या लोकांशी बोलतात. या वर्षातील हा सातवा कार्यक्रम आहे. आजच्या कार्यक्रमात मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टोकियो ऑलिम्पिक, अमृत महोत्सव आणि महापूरावर मोदी भाष्य करण्याची शक्यता आहे.
जून महिन्यातील मन की बात -
पंतप्रधान मोदींनी गेल्या महिन्यातील मन की बात कार्यक्रमात कोरोना, जल संरक्षण ,राष्ट्रीय डॉक्टर दिन , India First आणि टोकियो ऑलिम्पिकवर भाष्य केले होते.