लखनऊ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर योद्धा महाराज सुहेलदेव यांच्या पुतळ्याची पायाभरणी केली. व्हर्च्युअली आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोदींनी पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ केला. स्त्रावस्ती या ऐतिहासिक साम्राज्याचा सुहेलदेव हा प्रसिद्ध राजा होता. तुर्की राजा गझनवीदचा पराभव करून त्याला सुहेलदेवने ठार मारले होते. या ठिकाणाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येत आहे.
शहराच्या सुशोभीकरणासाठी अनेक प्रकल्प -
चित्तोरा तलावासह बहारीच शहराच्या सुशोभीकरणासाठी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले. कॅफेटेरिया, अतिथिगृह, मुलांसाठी पार्कचे कामही येथे करण्यात येणार आहे. स्त्रावस्ती जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
राजा सुहेलदेव यांना राजभर समाजात महत्त्वाचे स्थान आहे. गझनवीद राजा गाझी सय्यद मसूद यांचा चित्तोरा नदीच्या किनाऱ्यावर इ.स.वी १ हजार ३३ व्या शकतात सुहेलदेवने पराभव केला होता.