ETV Bharat / bharat

Platform Ticket Price : रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीटात होणार तिप्पट वाढ

author img

By

Published : Oct 6, 2022, 11:48 AM IST

Updated : Oct 6, 2022, 1:54 PM IST

दिल्ली विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांनी सणासुदीच्या काळात लोकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ( Platform Ticket Price ) 10 ते 30 रुपयांपर्यंत वाढवण्याचा आदेश जारी केला आहे. हा आदेश 31 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीच्या सर्व स्थानकांवर लागू राहील. ( Platform Ticket Price Has Been Increased ) मात्र मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. कारण मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ नाही. असे मध्य आणि पश्चिम रेल्वे मुंबई महामंडळाने सांगितले आहे.

Platform Ticket Price
प्लॅटफॉर्म तिकीट

नवी दिल्ली : जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जात असाल तर तुमचा खिसा थोडा मोकळा होणार आहे. वास्तविक, आता रेल्वे स्थानकावर 10 रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट तिप्पट किमतीत ( Platform Ticket Price ) उपलब्ध होणार आहे. सणासुदीच्या काळात लोकांची होणारी गर्दी पाहता दिल्ली विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांनी हा आदेश जारी केला आहे. ( Platform Ticket Price Has Been Increased )

मध्य आणि पश्चिम रेल्वे मुंबई महामंडळाने केला खुलासा : मुंबईत छट पूजा निमित्ताने रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ नाही. मध्य आणि पश्चिम रेल्वे मुंबई महामंडळाने केला खुलासा छट पूजा मुळे दिल्लीतल्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ झाल्याने नागरिकांत होती चिंता.

सणांमुळे स्थानकांवर वाढणार गर्दी : नवी दिल्ली, जुनी दिल्ली, आनंद विहार टर्मिनल, हजरत निजामुद्दीन, दिल्ली सराय रोहिल्ला आणि गाझियाबाद स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे सणासुदीला सुरुवात झाली असून, लोकांची घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दी सुरू झाली आहे. नवरात्र आणि दसऱ्यानंतर येत्या काही दिवसांत दिवाळी, छठ आणि इतर सणांमुळे स्थानकांवर गर्दी वाढणार आहे.

तिकिटाची किंमत 10 ते 30 रुपयांपर्यंत वाढवण्याचा आदेश : दिवाळी आणि छठपूजेच्या दिवशी, लोक बिहार, उत्तर प्रदेशला जाण्यासाठी नवी दिल्ली, जुनी दिल्ली आणि इतर रेल्वे स्थानकांवर गर्दी करतात. विशेषत प्लॅटफॉर्म तिकीट खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दिल्ली विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांनी सणासुदीच्या काळात लोकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 10 ते 30 रुपयांपर्यंत वाढवण्याचा आदेश जारी केला आहे. दिल्ली विभागीय रेल्वे व्यवस्थापकाने (डीआरएम) जारी केलेल्या आदेशानुसार, 31 ऑक्टोबरपर्यंत रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट फक्त 30 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. यानंतर 1 नोव्हेंबरपासून प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा त्याच किमतीत 10 रुपये दिले जाणार आहे.

Last Updated : Oct 6, 2022, 1:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.