पिलीभीत - उत्तर प्रदेश सरकार महिलांशी संबंधित गुन्हे आणि धर्म परिवर्तनाची प्रकरणे कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र असे असूनही हे प्रकार थांबत नाहीत. असाच एक प्रकरण पिलीभीत जिल्ह्यातील घडला आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणाने महाराष्ट्रातील तरुणीला प्रेमप्रकरणात अडकवून 9 वर्षांपासून तिचे शारीरिक शोषण करून धर्मांतर केल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्रातील एका तरुणीने तिच्या तक्रारीत पोलिसांना सांगितले आहे की, ती 9 वर्षांपूर्वी रुद्रपूर येथे कामासाठी गेली होती. तेथे त्याची भेट पिलीभीत येथील सलमान नावाच्या तरुणाशी झाली. तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 9 वर्षे शारीरिक संबंध ठेवले. या दरम्यान मुलीने आरोपीच्या दोन मुलींनाही जन्म दिला. तरुणीने आरोपीशी लग्न करण्यास सांगितले असता आरोपीने तिच्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकला. यानंतर पीडितेच्या आधार कार्डमध्ये तीचे नाव खोडतोड करत बदल केले.
पीडितेने कुटुंबीयांवर केले आरोप
पोलिसांत तक्रार करणाऱ्या पीडितेने आरोप केला आहे, की आरोपीची बहीण मेहजबी आणि भाऊ इम्रान यांनीही तिचे धर्मांतर करण्यात मदत केली. यासोबतच पीडितेचे म्हणणे आहे की, तिला सोडून दिल्यानंतर आरोपीने रुद्रपूर येथे राहणाऱ्या दुसऱ्या समाजातील एका मुलीलाही आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि लग्न न करता तिला पिलीभीत येथे नेले. फिर्यादी महिलेचा आरोप आहे की, दिवाळीपूर्वी फटाक्याचे दुकान उघडण्यासाठी आरोपी सलमानने तिच्याकडून 100000 रुपये घेतले होते.
पोलिसांनी दाखल केला गुन्हा
याबाबत माहिती देताना शहर कोतवाल अशोक पाल यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून बलात्कार, धर्म परिवर्तन कायदा, फसवणूक अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून कारागृहात पाठवण्यात येत आहे.
हेही वाचा - अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ.. ईडीनंतर आता कॅश फॉर ट्रान्सफर प्रकरणात CIB मागणार कोठडी