ETV Bharat / bharat

गावकरी ज्या दगडांची कुलदेवता म्हणून पूजा करायचे, ती निघाली डायनासोरची अंडी!

Dinosaur Eggs As God : मध्य प्रदेशातील नर्मदा खोऱ्यातील गावकरी ज्या गोलाकार दगडांची कुलदेवता म्हणून पूजा करत होते, ती प्रत्यक्षात डायनासोरची अंडी निघाली आहेत. शास्त्रज्ञांनी आजूबाजूच्या गावांना भेटी देऊन ही डायनासोरची अंडी असल्याचं स्पष्ट केलं.

Dinosaur Eggs
Dinosaur Eggs
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 7:50 PM IST

पाहा व्हिडिओ

धार (मध्य प्रदेश) Dinosaur Eggs As God : मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या खोऱ्याचा संबंध लाखो वर्षांपूर्वीच्या डायनासोरशी आहे. सुमारे ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी या क्षेत्रात डायनासोरचं वास्तव्य होतं. येथे शास्त्रज्ञांना गेल्या अनेक वर्षांत डायनासोर्सची शेकडो अंडी सापडली आहेत.

डायनासोरच्या अंड्यांची कुलदैवत मानून पूजा : आता या भागातील धार जिल्ह्यात एक अजब घटना उघडकीस आली. कुक्षी तालुक्यातील पडलिया गावात ही घटना घडली आहे. झालं असं की, येथील गावकऱ्यांना शेती करताना शेतात गोल आकाराचे दगडं सापडत होते. हे गावकरी शतकानुशतकं या दगडांना कुलदैवत मानून त्यांची पूजा करत आहेत. मात्र आता हे दगडं म्हणजे चक्क डायनासोर्सची अंडी असल्याचं समोर आलं आहे!

पूर्वजांच्या काळापासून परंपरा चालू : ही घटना उघडकीस आल्यानंतर येथील एका गावकऱ्यानं सांगितलं की, ते या गोल आकाराच्या दगडाची पूजा 'काकर' म्हणजेच शेतातील भैरव देवाच्या रूपात करतात. ही परंपरा त्यांच्या पूर्वजांच्या काळापासून चालत आलेली आहे. सर्व गावकरी या परंपरेचं पालन करतात. गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, ही देवता त्यांच्या शेती आणि गुरांसह प्रत्येक प्रतिकूल संकटापासून रक्षण करते. मात्र, आता ग्रामस्थ पूजत असलेली देवता म्हणजे डायनासोरची अंडी असल्याचं समजल्यानंतर प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आलाय.

यापूर्वीही अनेक अंडी सापडली : उल्लेखनीय म्हणजे, पडलियासह कुक्षी तालुक्याचा हा परिसर डायनासोरच्या अंड्यांसाठी ओळखला जातो. येथे यापूर्वी डायनासोरची तब्बल २५६ अंडी सापडली आहेत. त्यांचा आकार सुमारे १५ ते १७ सेमी असल्याचं सांगितलं जातं. शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे याच्या तपासात गुंतले आहेत. या भागात गोल आकाराचे दगडं समजल्या जाणारी डायनासोरची अंडी गावकऱ्यांना इकडे तिकडे विखुरलेली आढळतात. याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नाही. तसेच या परिसराच्या सुरक्षेसाठी आजवर कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत.

हे वाचलंत का :

  1. डायनासोरचे दुर्मीळ अंडे: मध्य प्रदेशात सापडले डायनासोरचे दुर्मीळ अंडे, आकार दहापट मोठा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.