ETV Bharat / bharat

Joshimath : जोशीमठ आपत्तीग्रस्तांच्या संयमाचा बांध फुटला, भाजप प्रदेशाध्यक्षांना घेराव

author img

By

Published : Jan 9, 2023, 10:34 PM IST

जोशीमठमध्ये दरड कोसळल्यानंतर सरकारकडून सुरू असलेल्या मदतकार्यावर स्थानिक लोक समाधानी नाहीत. त्यामुळेच आता त्यांचा रोष सरकार आणि प्रशासनावर उमटत आहे. उत्तराखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र प्रसाद भट्ट (bjp state president mahendra bhatt) यांना जोशीमठमध्ये जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतप्त लोकांनी त्यांना घेराव घालून घोषणाबाजी केली. (people protest against bjp state president). (Joshimath Sinking).

people protest against bjp state president
आपत्तीग्रस्तांचा भाजप प्रदेशाध्यक्षांना घेराव

चमोली (उत्तराखंड) : उत्तराखंडमधील जोशीमठ शहर सध्या आपले अस्तित्व वाचवण्यासाठी लढाई लढत आहे. अशा परिस्थितीत आता येथील स्थानिक लोकांचा संतापही वाढत आहे. बेघर लोकांचा रोष प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर निघत आहे. जोशीमठ येथे पोहोचलेले उत्तराखंड भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट (bjp state president mahendra bhatt) यांनाही आपत्तीग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले. (people protest against bjp state president). (Joshimath Sinking).

महेंद्र भट्ट यांच्या विरोधात घोषणाबाजी : उत्तराखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र प्रसाद भट्ट बाधित भागाची पाहणी करण्यासाठी जोशीमठ येथे पोहोचले. तेव्हा लोकांनी त्यांना घेराव घातला आणि संताप व्यक्त केला. महेंद्र भट्ट लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण स्थानिक लोकं त्यांचे काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. संतप्त लोकांनी महेंद्र भट्ट यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही भाजप कार्यकर्त्यांनी महेंद्र भट्ट यांना कसेबसे गर्दीपासून दूर नेले.

जोशीमठच्या एसडीएम यांचाही विरोध : उत्तराखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र प्रसाद भट्ट हे बद्रीनाथ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत महेंद्र भट्ट यांचा काँग्रेसच्या राजेंद्र भंडारी यांनी पराभव केला होता. महेंद्र भट्ट यांच्या आधी जोशीमठच्या एसडीएम कुसुम जोशी यांचाही व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये स्थानिक लोक एसडीएम कुसुम जोशी यांच्याशी जोरदार वाद घालत होते आणि प्रशासनावर गंभीर आरोप करत होते.

मदत आणि बचाव कार्य चालू : दरड कोसळल्यानंतर जोशीमठमधील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सरकार मदत आणि बचाव कार्य वेगाने करत आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित आणि वित्तहानी टाळता येईल. प्रशासनाच्या पथकाने घरांचे सर्वेक्षण करून त्यावर लाल निशाण्या लावण्यास सुरुवात केली आहे. ज्या इमारतींवर लाल चिन्ह लावण्यात आले आहे त्या इमारती सुरक्षित नसून त्या लवकरच पाडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.