चाईबासा (झारखंड) - पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील मनोहरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका शाळेचे मुख्याध्यापक रमेशचंद्र महतो यांना ग्रामस्थांनी जोडे आणि चपलांचा हार घालून त्यांची गावभर धिंड काढली. शाळेतील एका शिक्षकेच्या नियुक्तीला बेकायदेशीर ठरवून त्याने तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप मुख्याध्यापकावर आहे. तसेच तो उशीरा रात्री मुलींना घेऊन शाळेत येत होता, असा आरोप शाळेच्या अध्यक्षांनी केला आहे.
शिक्षीकेकडे 50 हजारांची मागणी -
पीडित शिक्षीका 2003 मध्ये या शाळेत शिक्षीका म्हणून नियुक्त झाली होती. तर रमेशचंद्र महतो हा 2005 मध्ये या शाळेत रुजू झाला. दरम्यान, 2020मध्ये रमेशचंद्र महतो हा मुख्यध्यापक झाल्यानंतर त्याने शिक्षीकेला मानसिक त्रास देणे सुरू केले. तसेच त्याने शिक्षीकेकडे 50 हजारांची मागणी केल्याचा आरोपही पीडित शिक्षीकेने केला आहे. दरम्यान, या मुख्यध्यापकाने या महिला शिक्षीकेला बलात्काराचीही धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. दरम्यान, मंगळवारी यावरून दोघांमध्ये वादही झाला होता.
'रात्री मुलींना घेऊन येत होता शाळेत' -
शाळेच्या अध्यक्ष सुरेश चंद्र दास यांनी या मुख्यध्यापकांवर गंभीर आरोप लावले आहे. रमेशचंद्र महतो हा रात्री उशीरा मुलींना घेऊन शाळेत येत होता, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच याबाबत विचारणा केली असता, ती मुलगी नातेवाईक असल्याचे सांगत होता, गेल्या काही दिवसांत असा प्रकार अनेकदा झाला असल्याचेही ते म्हणाले.