डेहराडून (उत्तराखंड) - कर्णप्रयाग शहरातील बद्रीनाथ महामार्गाजवळ असलेल्या स्टेट बँकेजवळील एका टेकडीतून सोमवारी (दि. 2 ऑगस्ट) अचानकपणे डिझेल वाहू लागले. त्यानंतर लोकांनी डिझेल नेण्यासाठी डब्बे घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
कर्णप्रयागच्या मुख्य बाजारात असलेल्या पेट्रोलपंपमधील डिझेल टँकला गळती लागली होती. यामुळे पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका टेकडीतून डिझेल पाझरत वाहू लागला. हेच डिझेल घेण्यासाठी बद्रिनाथ महामार्गावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, महामार्गावर जाणाऱ्या वाहनधारकांनीही आपली वाहने थांबवत डिझेल घेण्यासाठी धाव घेतली.
सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कर्णप्रयाग येथील बदरीनाथ महामार्गाजवळ असलेल्या पेट्रोल पंपमधील डिझेलच्या टाकीला गळती लागली. यामुळे डिझेल पाझरत बद्रीनाथ महामार्गावर वाहू लागले. पेट्रोल पंपाजवळ असलेल्या टेकडीतून काहीतरी वाहत असल्याचे काही लोकांना दिसले. त्यानंतर काहींनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना डिझेलचा वास येऊ लागला.
त्यानंतर आसपास राहणाऱ्या लोकांनी व त्या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनचाकलांनी वाहणारा डिझेल डब्बा भरून घेऊ लागले. याबाबत पेट्रोलपंप संचालकाला माहिती मिळेपर्यंत हजारो लिटर डिझेल नाले व रस्त्यावरुन वाहून गेला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - काकाला अंधारात ठेवून पुतण्याचं काकूसोबत लग्न; वाचा संपूर्ण प्रकार...