नोकरदार लोक त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विविध योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करतात. आपण आपल्या म्हातारपणात आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून राहू नये, अशी त्यांची ईच्छा असते. म्हणुनच ते त्यांच्या पगाराचा काही भाग विविध प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवतात. सरकार देखील ही बाब लक्षात घेऊन, अनेक योजना राबवत असते. ज्यामध्ये दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करुन चांगला निधी जमा केला जाऊ शकतो. सरकारची अशीच एक योजना म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम. सेवानिवृत्ती निधी साठवून ठेवण्यासाठी ही सर्वात पसंतीची गुंतवणूक योजना आहे.
दीर्घकालीन गुंतवणूक : एनपीएस ही एक दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते. या योजनेत तुम्ही नोकरीदरम्यान पैसे जमा करता, जे तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरुपात मिळते. गुंतवणूकदाराला एनपीएस मध्ये जमा केलेले पैसे दोन प्रकारे मिळतात. सर्वप्रथम जमा केलेल्या रकमेचा मर्यादित भाग एकाच वेळी काढू शकता. त्याच वेळी, दुसरा भाग पेन्शनसाठी जमा केल्या जाईल. या करमेतून वार्षिक खरेदी केली जाईल. तुम्ही अॅन्युइटी विकत घेण्यासाठी जितके जास्त पैसे सोडाल, तितकी जास्त पेन्शन तुम्हाला निवृत्तीनंतर मिळेल.
दररोज 200 रुपये वाचविण्याची सवय लावा : ही योजना थेट सरकारशी जोडलेली आहे आणि या योजनेत तुम्हाला 60 वर्षे वयानंतर दरमहा 6000 रुपये गुंतवून 50,000 रुपये पेन्शन मिळू शकते. म्हणजेच तुम्हाला या योजनेत दररोज 200 रुपयांची बचत करुन गुंतवणूक करावी लागेल. महत्वाचं म्हणजे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला आयकरातील सूट मिळते. एनपीएस मध्ये गुंतवणूकदाराला 80C अंतर्गत सूट मिळते. तसेच 80 CCD अंतर्गत रुपये 50,000 हजार पर्यंत अतिरिक्त आयकर सूट मिळते.
दोन प्रकारची खाती : एनपीएस मध्ये दोन प्रकारची खाती उघडली जातात. - NPS Tier-1 आणि NPS Tier-2 (NPS). TIER 1 हे प्रामुख्याने अशा लोकांसाठी आहे, ज्यांना पीएफ जमा झालेला नाही आणि त्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा हवी आहे. यामध्ये तुम्ही किमान 500 रुपये जमा करुन खाते उघडू शकता. निवृत्तीनंतर, तुम्ही एकाच वेळी 60 टक्के रक्कम काढू शकता. उर्वरित 40 टक्के रकमेतून वार्षिकी खरेदी केल्या जातात.
50 हजार रुपये पेन्शन कशी मिळणार? : दरमहा 50 हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल ते समजून घेऊया. एनपीएस कॅल्क्युलेटरनुसार जर कोणी वयाच्या 24 व्या वर्षी एनपीएस मध्ये खाते उघडले आणि दरमहा 6000 रुपये गुंतवायला सुरुवात केली. म्हणजेच दररोज 200 रुपये वाचवावे लागतील. अशाप्रकारे, तो वयाच्या 60 वर्षापर्यंत या योजनेत गुंतवणूक करेल. म्हणजे तो एकूण 36 वर्षांसाठी या योजनेत पैसे जमा करेल.
50,902 रुपये पेन्शन मिळेल : अशाप्रकारे, वयाच्या 60 व्या वर्षी, तो 25,92,000 रुपये गुंतवणूक म्हणून जमा करेल. आता जर आपण 10% परतावा गृहीत धरला तर एकूण कॉर्पस मूल्य 2,54,50,906 रुपये होईल. मग NPS मॅच्युरिटी उत्पन्नातून 40% दराने अॅन्युइटी विकत घेते, नंतर रक्कम 1,01,80,362 रुपये होईल. गुंतवणुकीवर 10% परतावा गृहीत धरल्यास, त्याला 1,52,70,544 रुपये एकरकमी उत्पन्न मिळेल. अशाप्रकारे, वयाच्या 60 वर्षांनंतर त्यांना दरमहा 50,902 रुपये पेन्शन मिळेल.
करामध्ये किती सूट मिळेल : एनपीएस खातेधारकास कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत आणि कलम 80CCD अंतर्गत अतिरिक्त 50,000 रुपयांची आयकर सूट मिळते. परंतु तुम्हाला वार्षिकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागेल.