नवी दिल्ली:राज्यसभेतील 12 खासदारांचे संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे. त्या विरोधात हे खासदार संसदेच्या आवारात महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सपा खासदार जया बच्चन यांनी आज 12 निलंबित राज्यसभा खासदारांच्या धरणे आंदोलनाला भेट दिली. त्यांच्या समवेत शिवसेना खासदार संजय राऊत, माजी केद्रिय मंत्री प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होते.
खासदारांनी निलंबन मागे घ्यावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे. मात्र त्यांनी माफी मागितल्याशिवाय निलंबनाची कारवाई रद्द होणार नसल्याची भुमिका राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी घेतली आहे.निलंबीत खासदार दररोज सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत संसदेच्या आवारात धरणे आंदोलन करत आहेत. विविध पक्षांच्या खासदारांनीही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.