ETV Bharat / bharat

Paryushana Parv 2022 जैन धर्मातील सर्वात पवित्र उत्सव पर्युषण पर्व - Paryushan Parva

जैन समाजाचा Jainism सर्वात पवित्र उत्सव holiest festival म्हणजेच पर्युषण पर्व Paryushana Parv 2022 आहे. पर्युषण पर्वाला Paryushan Parva जैन समाजात सर्वात मोठे पर्व मानला जाते आणि त्यामुळे त्याला पार्वधिराज असेही म्हटले जाते. या पर्वात जैन धर्माच्या पाच सिद्धांताचे पालन केले जाते. हे पाच सिद्धांत म्हणजे सत्य, अहिंसा, असतेय ,ब्रह्मचर्य, आणि अपरिग्रह हे होय.

Paryushana Parv 2022
पर्युषण पर्व
author img

By

Published : Aug 21, 2022, 4:13 PM IST

Updated : Aug 24, 2022, 12:03 PM IST

सोलापूर जैन समाजाचा Jainism सर्वात पवित्र उत्सव holiest festival म्हणजेच पर्युषण पर्व Paryushana Parv 2022 आहे. याची सुरुवात 24 ऑगस्ट पासून होणार आहे. जैन धर्मातील श्वेतांबर पंथातील बांधव हे 8 दिवस पर्युषण पर्व Paryushan Parva साजरा करतात. तर दिगंबर पंथातील बांधव हे 1 सप्टेंबर पासून पूढील दहा दिवस पर्युषण पर्व साजरा करतात. पर्युषण पर्वात जैन समाजातील श्वेतांबर आणि दिगंबर बांधव पवित्र व्रताचे पालन करतात. पर्युषण पर्वाला जैन समाजात सर्वात मोठे पर्व मानला जाते आणि त्यामुळे त्याला पार्वधिराज असेही म्हटले जाते. या पर्वात जैन धर्माच्या पाच सिद्धांताचे पालन केले जाते. हे पाच सिद्धांत म्हणजे सत्य, अहिंसा, असतेय ,ब्रह्मचर्य, आणि अपरिग्रह हे होय.

पर्युषण पर्व म्हणजे काय पर्युषण पर्व म्हणजे मनातील सर्व विकार कमी करणे. म्हणजेच या उत्सवात आपल्या मनातील सर्व वाईट विचार दूर करण्याचा उपवास म्हणजे पर्युषण पर्व होय. जैन धार्मिक नेते, जैन समाजातील बांधव हे पर्युषण पर्वाच्या काळात मनातील सर्व विचार, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, आणि वैराग्यापासून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधतात. हा उत्सव साजरा करणारे अनुयायी भगवान महावीरांनी सांगितलेल्या 10 नियमांचे पालन करून पर्युषण पर्व साजरा करतात.

श्वेतांबर आणि दिगंबर पंथ पर्युषण पर्व साजरा करतात जैन धर्मातील दिगंबर पंथातील अनुयायी पर्युषण पर्वच्या काळात 10 दिवस विविध व्रतांचे पालन करतात. म्हणून दिगंबर पंथातील जैन बांधव पर्युषण पर्वाला दसलक्षणा पर्व असेही म्हणतात. श्वेतांबर पंथातील जैन बांधव आठ दिवस उत्सव साजरा करतात. या आठ दिवसांत विविध व्रतांचे पालन करतात. म्हणून श्वेतांबर पंथातील जैन बांधव अष्टीक पर्युषण पर्व साजरा करतात.

पर्युषण पर्वात जैन बांधव संपूर्ण जगासाठी प्रार्थना करतात हिंदू धर्मातील नवरात्र प्रमाणे जैन समाजात पर्युषण पर्व साजरा केला जातो. जैन धर्माचे मुख्य तत्व अहिंसेवर चालण्याचा मार्ग दाखवतो. या पर्युषण पर्वात जैन धर्मीय नागरिक संपूर्ण जगासाठी प्रार्थना करतात. आणि आपल्याकडून झालेल्या चुकां बाबत माफी मागतात. या उत्सवात जैन बांधव संपूर्ण भक्ती भावाने धार्मिक उपवास करतात. पावसाळ्यात हा पर्व साजरा केला जातो, पावसाळ्यातील चार महिन्यात पृथ्वीतलावर सर्वत्र हिरवळ वाढते. या काळात बऱ्याच प्रकारचे प्राणी सूक्ष्मजीव जन्माला येत असतात. हे सर्व लक्षात घेऊन जैन साध्वीनी या काळात एका ठिकाणी राहून देवाची उपासना करण्याचा संदेश दिला आहे.

हेही वाचा Shravan 2022 श्रावणी शुक्रवार किंवा जरा जिवंतिका पूजन म्हणजे काय, जाणून घ्या

Last Updated : Aug 24, 2022, 12:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.