नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ सुरू असून आज विरोधकांनी काळे कपडे घालून मणिपूर हिंसाचाराचा निषेध केला आहे. दुसरीकडे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी रखडलेल्या उड्डाण पुलाचे बांधकाम, राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढल्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यासह निशिकांत दुबे यांनी राष्ट्रीय महामार्गावर होणारे अतिक्रमण, गतीरोधकांमुळे होणारे अपघाताचा मुद्दाही उपस्थित केला. त्यावर रस्ते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे उत्तर केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. उड्डाण पुलाच्या बांधकामात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
-
लोकसभा में राष्ट्रीय राजमार्गों पर ओवर ब्रिज के संबंध में केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी का उत्तर। #QuestionHour #MonsoonSession pic.twitter.com/4rT416Ij6K
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) July 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">लोकसभा में राष्ट्रीय राजमार्गों पर ओवर ब्रिज के संबंध में केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी का उत्तर। #QuestionHour #MonsoonSession pic.twitter.com/4rT416Ij6K
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) July 27, 2023लोकसभा में राष्ट्रीय राजमार्गों पर ओवर ब्रिज के संबंध में केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी का उत्तर। #QuestionHour #MonsoonSession pic.twitter.com/4rT416Ij6K
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) July 27, 2023
पाच वर्षापासून उड्डाण पूल रखडले : झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या मतदार संघात पाच वर्षाअगोदर राष्ट्रीय महामार्गावर चार उड्डाणपूल बनवण्यात येणार होते. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र त्या उड्डाणपुलाचे बांधकाम अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे खासदार निशिकांत दुबे यांनी राज्य सरकारच्या पीडब्लूडीच्या माध्यमातून हा उशीर होतो का, याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर नितीन गडकरी यांनी उत्तर दिले. या चार उड्डाणपुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने उशीर केल्यामुळे तो बदलण्यात आला. मात्र त्यानंतर जर राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभागाकडून उशीर होत असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
शेतकरी रात्री सोडतात जनावरे मोकळे : खासदार निशिकांत दुबे यांनी राष्ट्रीय महामार्ग 114 ए आणि 133 वर मोठ्या प्रमाणात जनावरांमुळे अपघात होत असल्याचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला. फक्त माझ्या मतदार संघातच नाही, तर देशभरातच जनावरांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याचे निशिकांत दुबे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकरी रात्री जनावरं मोकळे सोडतात, त्यामुळे ही जनावरं रात्री रस्त्यावर येऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट केले. संबंधित शेतकऱ्यांना याबाबत समज देण्यात येईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते सुरक्षेला प्राधान्य देत असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
गतिरोधकामुळे होतात अपघात : खासदार निशिकांत दुबे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अत्यंत चांगले काम करण्यात आले आहे. रोडही जबरदस्त बनवण्यात आला आहे. मात्र महामार्गावर बनवण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे अपघात होत आहेत. रात्री दुचाकीधारक गतिरोधकांमुळे पडून अपघात होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुरक्षेसाठी उपाययोजना करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.
हेही वाचा -