नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावर आता लोखंडाऐवजी बांबूपासून बनवलेल्या बाहुबलीचे संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नीतमंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत दिली. महामार्गाच्या कडेला लोखंडी जाळ्या असल्याने त्यांचा धोका वाहनधारकांना होता. मात्र बांबूच्या बाहूबल्लीचे संरक्षण दिल्याने यापासून वाहनधारकांची सुटका होणार आहे. दुसरीकडे बांबूच्या जाळ्या इको फ्रेंडली असून त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. छत्तीसगडमध्ये प्रायोजिक तत्वावर हा प्रयोग करण्यात येणार असून त्यानंतर हा प्रकल्प देशभरात लागू करण्यात येणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. दुसरीकडे मणिपूर हिंसाचार प्रकरणावरुन महाराष्ट्रातील खासदार चांगलेच आक्रमक झाले आहेत.
-
राज्यसभा में राजमार्गों पर बाहु बल्ली बाड़ लगाए जाने के संबंध में केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी का उत्तर। #QuestionHour #MonsoonSession pic.twitter.com/LAqFtWpQqG
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) July 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">राज्यसभा में राजमार्गों पर बाहु बल्ली बाड़ लगाए जाने के संबंध में केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी का उत्तर। #QuestionHour #MonsoonSession pic.twitter.com/LAqFtWpQqG
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) July 26, 2023राज्यसभा में राजमार्गों पर बाहु बल्ली बाड़ लगाए जाने के संबंध में केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी का उत्तर। #QuestionHour #MonsoonSession pic.twitter.com/LAqFtWpQqG
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) July 26, 2023
काय आहे बांबूचा बाहुबली प्रकल्प : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून महामार्गाच्या कडेला बांबूपासून बनवण्यात आलेल्या 'बाहुबली' या संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम करण्यात आले. हा प्रकल्प अगोदर चंद्रपूर जिल्ह्यातील वणी आणि यवतमाळ या महामार्गावर 200 मीटरवर बसवण्यात आला. बांबूपासून बनवण्यात आलेल्या 'बाहुबली' संरक्षण जाळ्याचा चांगलाच लाभ होत असल्याचे दिसून आले. महामार्गावर जंगली श्वापदे येऊ नये, म्हणून या जाळ्यांचा चांगलाच उपयोग होत आहे. वाहनधारकांनाही याचा कोणताही धोका नाही.
-
#WATCH | Shiv Sena (UBT) MP Priyanka Chaturvedi says, "...Someone is steering clear of his responsibility, someone is not shouldering his responsibility towards Manipur - people are wondering why is the PM not coming to the Parliament...If we have to use this No Confidence Motion… pic.twitter.com/cqamieW6M5
— ANI (@ANI) July 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Shiv Sena (UBT) MP Priyanka Chaturvedi says, "...Someone is steering clear of his responsibility, someone is not shouldering his responsibility towards Manipur - people are wondering why is the PM not coming to the Parliament...If we have to use this No Confidence Motion… pic.twitter.com/cqamieW6M5
— ANI (@ANI) July 26, 2023#WATCH | Shiv Sena (UBT) MP Priyanka Chaturvedi says, "...Someone is steering clear of his responsibility, someone is not shouldering his responsibility towards Manipur - people are wondering why is the PM not coming to the Parliament...If we have to use this No Confidence Motion… pic.twitter.com/cqamieW6M5
— ANI (@ANI) July 26, 2023
लोखंडी जाळ्यापेक्षा किफायतशीर : बांबूच्या या 'बाहुबली' जाळ्या लोखंडी जाळ्यांपेक्षा किफायतशीर आहेत. लोखंडी जाळ्यांमुळे अपघातावेळी वाहनधारकांना जिविताला मोठा धोका होण्याची शक्यता आहे. मात्र बांबूच्या संरक्षक जाळ्यामुळे कोणताही धोका होत नाही. उलट बांबूच्या जाळ्या पर्यावरणपूरक असून मजबूत असल्याचे दिसून येते.
'बाहुबली' संरक्षक जाळ्यांना प्रथम श्रेणी घोषित : बांबू क्रॅश बॅरियरची इंदूर येथील नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक (NATRAX) येथे चाचणी केल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यासह रुरकी येथील सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CBRI) येथे झालेल्या फायर रेटिंग चाचणी दरम्यान बाहूबल्ली संरक्षक जाळ्यांना प्रथम श्रेणी घोषित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
मणिपूरवरुन खासदार आक्रमक : मणिपूर हिंसाचार प्रकरणावरुन संसदेच्या दोन्ही सदनात महाराष्ट्रातील खासदार चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांनी मणिपूर प्रकरणावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत येत नाहीत, मणिपूर हिंसाचारावर कोणतीही भूमिका मांडत नाहीत. अद्यापही मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. त्यामुळे सरकारवर अविश्वासाचा ठराव आणावा लागणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भावना गवळींच्या प्रश्नाला उत्तर दिले : संसदेत बुधवारी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी वनक्षेत्रावर आधारित एक प्रश्न विचारला. याला वन व पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव यांनी उत्तर दिले.
हेही वाचा -