ETV Bharat / bharat

Parliament Monsoon session live 2023: विरोधीपक्षांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज उद्या पर्यंत तहकूब

बुधवारीही विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत गदारोळ केला. गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. त्या नंतरही विरोधकांचा गोंधळ सुरुच राहिल्यामुळे ते उद्या गुरुवार पर्यंत स्थगित करण्यात आले आहे.(Parliament Monsoon session)

लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

author img

By

Published : Aug 2, 2023, 12:48 PM IST

Updated : Aug 2, 2023, 2:56 PM IST

नवी दिल्ली: बुधवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत गदारोळ घातल्यामुळे दुपारी दोन वाजे पर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्या नंतरही विरोधकांचा गोंधळसुरु राहिल्यामुळे अखेर लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले तर विरोधकांच्या गदारोळातच राज्यसभेचे कामकाज सुरूच आहे

  • #WATCH | "When Rajya Sabha Chairman said that we've admitted the notice for discussion on Manipur and called names for the same, we started speaking but then they (opposition) made excuse quoting rule. It means that they are just giving excuses and are not interested in having… pic.twitter.com/7C7aUNNj2W

    — ANI (@ANI) August 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, राज्यसभेच्या अध्यक्षांनी मणिपूरवर चर्चेसाठी नोटीस स्वीकारली आहे आणि नावे मागितली आहेत असे सांगताच आम्ही बोलू लागलो, पण त्यांनी म्हणजे विरोधकांनी नियमाचा हवाला देत सबब सांगितली. याचा अर्थ ते केवळ सबबी सांगत आहेत आणि त्यावर चर्चा करण्यात त्यांना रस नाही. दुसरे म्हणजे, लोकसभेत दिल्ली संबंधी महत्त्वाचे विधेयक मांडले जाईल, त्यामुळे त्यावर आज चर्चा होईल.

आज लोकसभेत दिल्ली सरकार सुधारणा विधेयक मांडण्यात येणार होते. परंतु विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. तसेच मणिपूरच्या घटनेवरुन विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. या गदारोळामुळे लोकसभा अध्यक्षांनी दोन वाजेपर्यंत संसदेचे कामकाज तहकूब केले आहे. नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली सरकार सुधारणा विधेयक-2023 मध्ये काही बदल केले जाणार आहेत. हे विधेयक बदलांसह लोकसभेत सादर करण्यात आले. मात्र विरोधकांचा गोंधळ न थांबल्यामुळे अखेर कामकाज उद्या पर्यंत तहकुब करण्यात आले आहे.

  • Opposition parties stage walkout from the Rajya Sabha as the 60 notices submitted under Rule 267 to hold a discussion on Manipur violence were declined by the Chair. https://t.co/ZSceUBDyFA

दरम्यान विधेयक मांडताना विरोधी पक्षांनी गदारोळ केला. प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजीत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक मांडले. दिल्ली सेवा विधेयकावर चर्चा करण्यापूर्वी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणाले की,आज देशाच्या संविधानाचा आणि लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. हे विधेयक राज्यसभेत अपयशी ठरणार आहे.

  • #WATCH | On Haryana's Nuh incident, National Conference (NC) President Farooq Abdullah says, "Whatever happened in Nuh is heartbreaking. Fighting over religion is not good for India. India is everyone's country, every religion here has the right to grow." pic.twitter.com/w8JePrTbkT

राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांची संसदेतील विरोधी पक्षांच्या सभागृहात कामकाजाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी समविचारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला शरद पवार आणि फारुख अब्दुल्लाही उपस्थित होते. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी आणि 'इंडिया' या अघाडीचे 31 खासदारांनी मणिपूर दौऱ्यासंदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

  • #WATCH | Union Minister Anurag Thakur says, "Opposition leaders are not ready to discuss on the Manipur issue, they are not taking part in the Parliament discussion. They are just running away from it, they don't take the Parliament seriously. Opposition can go to Manipur but… pic.twitter.com/mas8xT1Eaw

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, 'विरोधक नेते मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करायला तयार नाहीत, ते संसदेच्या चर्चेत भाग घेत नाहीत. ते फक्त त्यापासून पळ काढत आहेत, ते संसदेला गांभीर्याने घेत नाहीत. विरोधी पक्ष मणिपूरला जाऊ शकतात पण ते पश्चिम बंगाल किंवा राजस्थानमध्ये जाऊ शकत नाहीत. 'जे विधेयक आणले जात आहे त्याला विरोध करून काहीही होणार नाही. त्याऐवजी विरोधकांनी संसदेत येऊन चर्चेत भाग घ्यावा. यामुळे त्यांना बरेच काही कळेल.

हेही वाचा

Last Updated : Aug 2, 2023, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.