मोहाली : पंजाबचे दिग्गज राजकारणी आणि माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. बादल यांना शुक्रवारी मोहालीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष आहे.
-
Concerned to know that the veteran leader Shri Parkash Singh Badal Ji is unwell and admitted to hospital. Had a telephone discussion about his health with Shri Sukhbir Singh Badal Ji.
— Amit Shah (@AmitShah) April 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
I pray to God for his speedy recovery.
">Concerned to know that the veteran leader Shri Parkash Singh Badal Ji is unwell and admitted to hospital. Had a telephone discussion about his health with Shri Sukhbir Singh Badal Ji.
— Amit Shah (@AmitShah) April 21, 2023
I pray to God for his speedy recovery.Concerned to know that the veteran leader Shri Parkash Singh Badal Ji is unwell and admitted to hospital. Had a telephone discussion about his health with Shri Sukhbir Singh Badal Ji.
— Amit Shah (@AmitShah) April 21, 2023
I pray to God for his speedy recovery.
5 वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत : प्रकाशसिंह बादल हे पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचे वरिष्ठ नेते आहेत. ते सध्या 95 वर्षांचे आहेत. प्रकाशसिंह बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. बादल हे पंजाबच्या राजकीय वर्तुळात आणि गावागावात नेहमीच चर्चेचा विषय असतात. राज्यातील बहुसंख्य लोक त्यांना पंजाबच्या राजकारणातील अनुभवी खेळाडू मानतात. पण, आता म्हातारपणामुळे ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले आहेत. या आधीही बादल यांची प्रकृती बऱ्याच वेळा बिघडली आहे.
प्रकाशसिंह बादल यांची राजकीय कारकीर्द : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी 1947 मध्ये राजकारणात पदार्पण केले. 1957 मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक जिंकली. 1969 मध्ये त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. 1969 - 1970 पर्यंत त्यांनी सामुदायिक विकास, पंचायती राज, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय इत्यादी मंत्रालयांमध्ये कार्यकारी मंत्री म्हणून काम केले. प्रकाशसिंग बादल हे 1970 - 71, 1977 - 80, 1997 - 2002 दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री आणि 1972, 1980 आणि 2002 मध्ये विरोधी पक्षनेते होते. मोरारजी देसाई यांच्या कारकिर्दीत ते खासदारही राहिले आहेत.
17 वर्षे तुरुंगात घालवली : प्रकाशसिंह बादल यांच्याकडे केंद्रीय मंत्री म्हणून कृषी आणि पाटबंधारे मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याशिवाय बादल हे पंजाबमधील शीखांंचा राजकीय पक्ष शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आहेत. प्रकाशसिंग बादल यांनी आपल्या आयुष्यातील सुमारे 17 वर्षे पंजाब, पंजाबियत आणि पंजाबींचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या हिताचा आवाज उठवण्यासाठी तुरुंगात घालवली आहेत.
हेही वाचा : Satya Pal Malik summoned by CBI : सत्यपाल मलिक यांना CBI चे समन्स, 28 एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले