ETV Bharat / bharat

Panipat Rape Murder Case : कारखान्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्याला अटक; मृतदेह ठेवला होता कचऱ्यात लपवून - महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया

Panipat Rape and Murder Case : हरियाणातील पानिपत येथील एका कारखान्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा विटा आणि दगडांनी ठेचून खून करणाऱ्या आरोपी कंत्राटदाराला पोलीस पथकानं अटक केली आहे

Panipat Rape and Murder Case
Panipat Rape and Murder Case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 11:23 AM IST

पानिपत (हरियाणा) Panipat Rape and Murder Case : हरियाणाच्या पानिपतच्या सेक्टर-25 भाग 2 मध्ये असलेल्या एका कारखान्यात बलात्कार केल्यानंतर कारखान्याच्या ठेकेदारानं 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची वीट आणि दगडानं ठेचून हत्या केली. कारखान्याच्या तिसर्‍या मजल्यावरील छतावरील कचऱ्याखाली ठेकेदारानं मृतदेह लपवून ठेवला होता. मुलीच्या काकांनी पुतणीचं अपहरण करून कारखान्यात लपवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. परंतु, पोलिसांनी कुटुंबीयांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्यानंतर पीडित कुटुंबानं एसपी ते डीसीपर्यंत दाद मागितली पण कोणतीही कारवाई न झाल्यानं अखेर कुटुंबीयांनी राज्याचे गृहमंत्री अनिल विज आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडं या घटनेची तक्रार केली.

गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन 24 तासांत खुनाचा उलगडा : घटनेची माहिती मिळताच गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तपास सीआयए वन पोलिसांकडे सोपवण्यात आला. तपासात गुंतलेल्या सीआयए वनच्या पथकानं 24 तासांत या खून प्रकरणाचा खुलासा केला. हत्येचा आरोप असलेल्या ठेकेदाराला पोलिसांनी अटक केलीय. आरोपी ठेकेदाराला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीत घेण्याची तयारी पोलीस करत आहेत.

कुटुंबीयांचे कंत्राटदारावर गंभीर आरोप : अनेक दिवसांनी कुटुंबीयांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांचीही भेट घेतली. आरोपीला पोलिस ठाण्यात बसून चहा प्यायला लावल्याचं कुटुंबीयांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना सांगितलं. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आदेश देऊनही पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई केली नाही. हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्यानं गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांना जाग आली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण सीआयए वन कडे वर्ग केलं.

"पानिपतमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी पोलीस पथकानं आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या माहितीवरूनच ही घटना उघडकीस आली. आरोपीला न्यायालयात हजर करून रिमांडवर घेण्याची तयारी सुरू आहे. त्याला रिमांडवर घेऊन आरोपींची अधिक कसून चौकशी केली जाईल, जेणेकरून प्रकरणाचा तळ गाठता येईल." - दीपक सीआयए स्टेशन प्रभारी

स्लिपर आणि सीसीटीव्हीमुळं उघड झालं रहस्य : कुटुंबीयांनी कारखान्यात मोठ्या प्रमाणावर शोध घेतल्यानंतर अल्पवयीन मुलीची चप्पल जप्त केली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता, अल्पवयीन मुलगी कारखान्याच्या आत जाताना दिसली, पण बाहेर येताना दिसली नाही. कुटुंबीयांच्या संशयावरून सीआयएच्या पथकानं कंत्राटदार कुलदीपला ताब्यात घेऊन त्याची कडक चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपी कॉन्ट्रॅक्टर कुलदीपनं सीआयए वन टीमला सांगितलं की, तो मुलीला कामाच्या बहाण्यानं टेरेसवर घेऊन गेला होता. तिथं मुलीवर बलात्कार झाला. मी तिला थांबवलं, पण ती रडतच राहिली. घरी वारंवार सांगणार असल्याच सांगितलं. मला राग आला म्हणून मी जवळच पडलेल्या विटेने तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली लपवला, अशी कबुली आरोपीनं दिलीय.

हेही वाचा :

  1. Mumbai Crime : महिलेला जिवंत जाळल्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा
  2. Beed Crime : बीड हादरलं; घरावर पेट्रोल टाकून सहा जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, मध्यरात्री घडला थरार
  3. Minor Girl Rape : नातेवाईकावर विश्वास ठेवणं पडलं महागात; अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.