कटक (ओडिशा) - अतागड वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी छापा टाकत, तस्करांकडे असलेले पँगोलीन (खवले मांजर) पकडले होते. या मांजराला शनिवारी जंगलामध्ये सोडण्यात आले.
अतागड वनविभागाच्या अधिकारी अस्मिता लेंका यांनी सांगितले की, 'मागील एका वर्षात खवल्या मांजर तस्करी प्रकरणात १३ जणांना अटक करण्यात आली आहे.'
काही दिवसांपूर्वी आम्ही तस्करांकडून एका खवल्या मांजराला वाचवले होते. ते मांजर आजारी होते. म्हणून आम्ही त्याच्यावर योग्य ते उपचार करत त्याला निरिक्षणाखाली ठेवले होते. मांजराची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला जंगलामध्ये सोडण्यात आले, असे लेंका यांनी सांगितलं.
दरम्यान, जागतिक पातळीवर खवल्या मांजराची संख्या झपाट्याने कमी होत असून ५० ते ८० टक्क्यांनी या वर्गाची संख्या घसरली आहे. चीन आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशात खवल्या मांजराच्या मांसाला अधिक मागणी आहे. याशिवाय पारंपरिक चिनी औषधांसाठीही त्याचा वापर होतो. यामुळे याची शिकार मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
हेही वाचा - मद्यधुंद अवस्थेत पंतप्रधानांना ठार करण्याची धमकी देणारा ताब्यात
हेही वाचा - क्लिनिकल ट्रायलसाठी २३ हजार स्वयंसेवकांना सहभागी करणार भारत बायोटेक