ETV Bharat / bharat

Pandit Nehru Jayanti 2022 : भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची जयंती, स्वातंत्र्यलढ्यातील सक्रिय व्यक्तीमत्व - first Prime Minister of India

जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान (first Prime Minister of India) व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी (active figure in freedom struggle) असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावानेही ओळखले जातात. पंडित नेहरूंना मुले फार आवडत, म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे. Pandit Jawaharlal Nehru Jayanti . Pandit Nehru Jayanti 2022

Pandit Nehru Jayanti 2022
पंतप्रधान जवाहरलाल नेहरु जयंती
author img

By

Published : Nov 4, 2022, 5:43 PM IST

नवी दिल्ली : पंडित नेहरु म्हणजेच सर्वांचे लाडके चाचा नेहरु. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान (first Prime Minister of India) होण्याचा मान पंडित नेहरु यांना मिळाला होता. पंडित नेहरुंना लहान मुलांचा अतिशय लळा होता. यामुळेच त्यांचा वाढदिवसा बालदिन म्हणून साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी (Pandit Jawaharlal Nehru Jayanti) अलाहाबाद, उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी नेहरू आणि वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू होते. पंडित मोतीलाल हे पेशाने बॅरिस्टर होते. पंडित नेहरूंच्या पत्नीचे नाव कमला नेहरू होते. त्यांना एक मुलगी इंदिरा गांधी होती, जी लाल बहादूर शास्त्रींची उत्तराधिकारी बनली आणि देशातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. active figure in freedom struggle . Pandit Jawaharlal Nehru Jayanti . Pandit Nehru Jayanti 2022

उच्चभ्रू कुटुंबातील होते नेहरु : पंडित नेहरू श्रीमंत कुटुंबातील होते. तसेच नेहरू हे तीन बहिणींचे एकुलते एक भाऊ होते. त्यामुळे नेहरूंच्या संगोपनात कधीच कमतरता आली नाही. त्यांचे प्रारंभिक शिक्षण अलाहाबाद येथे झाले. तर इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी लंडनमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान नेहरूजींनी समाजवादाची माहितीही गोळा केली. उच्च शिक्षण घेतल्यानंतर नेहरू 1912 मध्ये मायदेशी परतले आणि त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला.

स्वातंत्र्यासाठी महत्वपूर्ण योगदान : 1916 मध्ये नेहरूंनी कमला यांच्याशी विवाह केला. एका वर्षानंतर, 1917 मध्ये, ते होमरूल लीगमध्ये सामील झाले आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, 1919 मध्ये नेहरू पहिल्यांदा गांधींच्या संपर्कात आले. येथूनच नेहरूंचे राजकीय जीवन सुरू झाले. यानंतर गांधीजींसोबत नेहरूंनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. इतिहासकारांच्या मते, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर अधिवेशनाअंतर्गत 31 डिसेंबर 1929 रोजी रात्री 12 वाजता रावी नदीच्या काठावर प्रथम तिरंगा फडकावला होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेहरू अनेकदा तुरुंगात गेले. असे असूनही त्यांचे मनोबल खचले नाही. नेहरूजींना मुलांची खूप आवड होती. ते लहान मुलांना गुलाब मानायचे. त्यामुळे मुलेही त्यांना प्रेमाने चाचा म्हणत असत.

भारतरत्न पुरस्काराने सन्मान: जवाहरलाल नेहरूंनी जोसिप बुरोज टिटो आणि अब्दुल गमाल नासिर यांच्यासमवेत आशिया आणि आफ्रिकेतील वसाहतवादाच्या समाप्तीसाठी एक असंलग्न चळवळ उभी केली. कोरियन युद्ध संपवणे, सुएझ कालवा विवाद मिटवणे आणि काँगो कराराची अंमलबजावणी यासारख्या इतर आंतरराष्ट्रीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी मध्यस्थ म्हणून काम केले. पश्चिम बर्लिन, ऑस्ट्रिया आणि लाओस सारख्या इतर अनेक स्फोटक समस्यांचे निराकरण करण्यात त्यांनी पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावली. 1955 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चीनकडे मैत्रीचा हात : पण नेहरूंना भारताचे पाकिस्तान आणि चीनशी संबंध सुधारता आले नाहीत. काश्मीर प्रश्न आणि चीनसोबतच्या मैत्रीतील सीमावाद हे पाकिस्तानशी करार होण्याच्या मार्गातील दगड ठरले. नेहरूंनीही चीनकडे मैत्रीचा हात पुढे केला, पण 1962 मध्ये चीनने कपटीपणाने हल्ला केला. नेहरूंसाठी हा मोठा धक्का होता. 27 मे 1964 रोजी जवाहरलाल नेहरूंना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.