मुंबई : पंचांगाच्या माध्यमातून वेळेची आणि काळाची अचूक गणना करण्यात येते. मात्र पंचांग हे पाच प्रकाराने बनलेले असते. हिंदू कॅलेंडरलाच वैदिक कॅलेंडर म्हणून संबोधतात. त्यामुळे पंचंगात नक्षत्रातील वार, तिथी, कारण, आणि योग या पाच प्रकाराचा पंचांगात समावेश करण्यात येतो. त्यावरुनच सूर्योदय आणि सूर्याची वेळ हिंदू महिना, राहू काळ शूभ काळ, आदीबाबतची माहिती जाणून घेतली जाते. याबाबतची माहिती ज्योतिषी शिवकुमार शर्मा यांनी दिली आहे, त्यावरुन जाणून घेऊया आजचे पंचांग.
आजची तारीख : 18-03-2023 शनिवार
ऋतू : वसंत
आजची तिथी : फाल्गुन कृष्ण एकादशी
आजचे नक्षत्र : श्रावण
अमृतकाळ : 06:42 to 08:13
राहूकाळ : 09:43 to 11:14
सुर्योदय : 06:42:00 सकाळी
सुर्यास्त : 06:46:00 सायंकाळी
पंचांगात तिथीला आहे महत्व : पंचांगात सगळ्यात महत्वाचे म्हणजे पंचांग स्थितीला महत्व देण्यात येते. मात्र त्यासाठी तिथी म्हणजे काय याबाबतची माहिती जाणून घेणे महत्वाचे ठरते. तिथी म्हणेज चंद्र रेषेला सूर्य रेषेपेक्षा १२ अंश वर जाण्याच्या वेळेला तिथी असे म्हणतात. महिन्यात साधारण तीस तिथी असल्याचे ज्योतिषी शिवकुमार शर्मा हे सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार शुक्ल पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौर्णिमा असे म्हणतात. तर कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या असे म्हणत असल्याचेही पंडीत शिवकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. तारखांच्या या नावात प्रतिपदा हे प्रथम स्थानावर असते. तर द्वितीया आणि तृतीया हे त्यानंतरच्या क्रमाने येते. असाच क्रम चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, अमावस्या आणि पौर्णिमा असा लावण्यात येत असल्याचेही पंडीत शिवकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
नक्षत्रांनाही आहे महत्व : ताऱ्यांच्या आकाशातील समूहाला नक्षत्र असे म्हणत असल्याची माहिती ज्योतिषी पंडीत शिवकुमार शर्मा यांनी दिली आहे. या नक्षत्रांमध्ये २७ नक्षत्रांचा भरणा असून नऊ ग्रहांचा या नक्षत्रांमध्ये भरणा असल्याचेही पंडीत शिवकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
आठवड्यातील वार : एका आठवड्यात सात दिवस असल्याने त्याच्या चक्राला आठवडा असे म्हणतात. आठवड्यातील पहिल्या दिवसाला सोमवार तर दुसऱ्या दिवसाला मंगळवार असे म्हणतात. त्यानंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या सात दिवसांचा क्रमाने समावेश असतो. आठवड्यात असलेल्या वारांना सात ग्रहांची नावे देण्यात आल्याचेही पंडीत शिवकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.