एर्नाकुलम (केरळ): Pakistani Haji Salim group: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि भारतीय नौदलाने कोची किनारपट्टीवर एक मोठी कारवाई केली आहे. यादरम्यान एका इराणी बोटीतून अमली पदार्थांची मोठी खेप जप्त करण्यात आली heroin consignment caught at Kochi आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे डेप्युटी डायरेक्टर जनरल (ऑपरेशन्स) संजय कुमार सिंग म्हणतात की, पाकिस्तानातील कुख्यात तस्कर टोळी हाजी सलीम ग्रुपचा हेरॉइन तस्करी प्रकरणात हात होता.
भारतीय नौदल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने संयुक्त कारवाईत 200 किलो हेरॉइनसह एक इराणी बोट जप्त केली. हेरॉईनची किंमत 1200 कोटी एवढी आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हेरॉईनची खेप श्रीलंकेला जात होती. भारतीय नौदलाने अडवल्यानंतर ही तस्कर टोळी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या श्रीलंकेच्या बोटीमध्ये माल पाठवण्याची योजना आखत होती. मात्र, माल गोळा करण्यासाठी आलेल्या श्रीलंकन बोटीचा शोध नौदलाला मिळू शकला नाही.
अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपास अहवालानुसार हेरॉईन अफगाणिस्तानातून आले होते. हाजी सलीम गटावर अमली पदार्थांच्या तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत आणि टोळीतील काही सदस्यांना यापूर्वी कोचीच्या किनारपट्टीच्या पाण्यात अटक करण्यात आली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. बोटीतून अटक करण्यात आलेले सहाही जण इराणी नागरिक असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. विमानात इराणी नागरिकांसह पाकिस्तानी नागरिकही होते, असे प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
आरोपींकडून सॅटेलाइट फोनही जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात संजय कुमार सिंह कोची येथे आले होते.